आयसीसीने (ICC) 2017 पासून नॉन-विकेटकीपरमध्ये सर्वाधिक कॅच पकडणाऱ्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीने या आकडेवारीत अव्वल पाच खेळाडूंची नावं दिली आहे. यात कोहली 95 कॅचेस सह पहिल्या स्थानावर आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगातील सर्व क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्या असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मागील तीन वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कॅच घेणाऱ्या नॉन-विकेटकीपरची यादी जाहीर केली आहे. जानेवारी 2017 पासून इंग्लंडचा फलंदाज जो रुट (Joe Root) 94 कॅचेस सह विराटच्या पाठोपाठ आहे. श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स अनुक्रमे 85 आणि 80 कॅचसह तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिसने 78 झेल सह पाचवे आणि अखेरचे स्थान मिळवले आहे. (Coronavirus लॉकडाउन काळात विराट कोहलीने शेअर केला पत्नी अनुष्का शर्मासोबतचा रोमँटिक फोटो, पाहा काय म्हणाला)
यापूर्वी, आयसीसीने 2017 पासून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांची नावं जाहीर केली. यात देखील विराटचं पहिल्या स्थानावर आहे. कोहलीने 63.17 च्या सरासरीने 2017 पासून आजवर 8,465 धावा केल्या आहेत. त्याच्या नंतर रोहित शर्माने 53.27 च्या सरासरीने 6,350 धावा केल्या आणि दुसरे स्थान मिळवले. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा टेस्ट कर्णधार जो रूट आहे. रूटने 6,203 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम 51.30 च्या सरासरीने 5,387 धावा करत यादीत चौथे स्थान मिळवले आहे. आणि न्यूझीलंडचा रॉस टेलरने 4,801 धावांच्या मदतीने या यादीत अंतिम स्थान मिळविले आहे.
Most international catches from non-wicketkeepers since January 2017:
🇮🇳 Virat Kohli ➔ 95
🏴 Joe Root ➔ 94
🇱🇰 Kusal Mendis ➔ 85
🏴 Ben Stokes ➔ 80
🇿🇦 Faf du Plessis ➔ 78 pic.twitter.com/1TZw0OYN82
— ICC (@ICC) April 13, 2020
2017 पासून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा
Most international runs since January 2017:
🇮🇳 Virat Kohli ➔ 8,465 @ 63.17
🇮🇳 Rohit Sharma ➔ 6,350 @ 54.27
🏴 Joe Root ➔ 6,203 @ 48.08
🇵🇰 Babar Azam ➔ 5,387 @ 51.30
🇳🇿 Ross Taylor ➔ 4,801 @ 51.07 pic.twitter.com/8oygdKq6oP
— ICC (@ICC) April 12, 2020
आतापर्यंत, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. आयसीसीचे मुख्यालयही बंद करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्याने संपूर्ण जगाला अडचणीत आणले आहे आणि एफ 1, एनबीए, ईपीएल, आयपीएल 2020, ला लीगा आणि इतर अनेक क्रीडा स्पर्धांवर त्याचा परिणाम झाला आहे.