Coronavirus लॉकडाउन काळात विराट कोहलीने शेअर केला पत्नी अनुष्का शर्मासोबतचा रोमँटिक फोटो, पाहा काय म्हणाला

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केलाय. फोटो कॅप्शनद्वारे विराटने एक महत्वाचा संदेश दिला. "जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याचे ज्ञान असणे एक आशीर्वाद आहे," असं विराटने म्हटले. या फोटोमध्ये त्यांचा डॉगी देखील आहे.

Coronavirus लॉकडाउन काळात विराट कोहलीने शेअर केला पत्नी अनुष्का शर्मासोबतचा रोमँटिक फोटो, पाहा काय म्हणाला
विराट कोहली-अनुष्का शर्मा (Photo Credit: Twitter/imVkohli)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सध्या जगभर तणावाचे वातावरण आहे. दररोज कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्यात वाढ होत आहे. भारतातही स्थिती गंभीर आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. या काळात सर्व खेळाडू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. ऐरवी क्रीडा स्पर्धांमुळे कुटुंबासोबत हवा तितका वेळ घालवता येत नसल्याने यंदा मिळालेल्या वेळेचा क्रीडापटू पुरेपूर वापर करून घेत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचाही (Virat Kohli) यात समावेश आहे. ऐरवी क्रिकेट मालिका आणि स्पर्धांमुळे व्यस्त असलेला विराट आपली पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोबत मिळाला दुर्मिळ असा वेळ घालवत आहे. विराट-अनुष्का या लॉकडाउन दरम्यान फोटोज शेअर करत आहे आणि त्यांच्या क्वारंटाइनबद्दल माहिती देत राहतात. काही दिवसांपूर्वी अनुष्काने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता, ज्यात ती आणि विराट तिच्या पालकांसोबत 'मोनोपॉली'चा खेळ खेळत आहे आणि आता विराटने अनुष्कासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केलाय. (लॉकडाउनमध्ये पानी-पुरी आणि बेसन बर्फीचा आनंद घेत आहे विराट कोहली-अनुष्का शर्मा, पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी)

फोटो कॅप्शनद्वारे विराटने एक महत्वाचा संदेश दिला. "जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे याचे ज्ञान असणे एक आशीर्वाद आहे," असं विराटने म्हटले. या फोटोमध्ये त्यांचा डॉगी देखील आहे. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का सोशल मीडियामध्ये खूप अ‍ॅक्टिव असतात. सध्या दोघे इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात दिसतात. नुकतंच अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीवर काही स्टोरीज शेअर केल्या. ज्यात ती तिच्या आईने बनवलेली आणि पाणी-पुरी आणि बेसन बर्फीचा आनंद लुटत असल्याचं सांगितलं. अनुष्कानेही फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये एक मोठा मेसेज लिहिला. अनुष्का म्हणते, “या वेळेने मला नक्कीच अधिक प्रतिबिंबित केले आहे. आपल्या प्रियजनांबरोबर घरी राहण्याची गरज संपूर्ण जगावर भाग पाडली गेली आहे परंतु आपल्या सर्वांसाठी हा एक महत्वाचा धडा आहे. काम आणि जीवन संतुलन राखण्याचा धडा आहे, प्रत्यक्षात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींमध्ये अधिक वेळ घालवण्याचा धडा आहे.” पाहा 'विरुष्का'चा हा रोमँटिक फोटो:

दरम्यान, यापूर्वी इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनसोबत एका मुलाखती दरम्यान विराटने सांगितले की दोघे पहिल्यांदा इतका वेळ सोबत रहायला मिळाला आहे. तब्बल 1 महिन्यापासून दोघे घरामध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2020 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).