विराट कोहली याने शार्दुल ठाकूर साठी खास मराठीत केली इंस्टाग्राम पोस्ट; वेस्ट इंडिज विरुद्ध खेळीसाठी कौतुकाची थाप
Virat Kohli And Shardul Thakur (Photo Credits: Instagram)

टीम इंडियाचा (Team India)  वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध शेवटचा क्रिकेट सामन्याची काल विराट ब्रिगेडच्या विजयाने सांगता झाली. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), के.एल. राहुल (K.L. Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli)  यांच्या अर्धशतकाची फॅन्समध्ये मोठी चर्चा झाली. मात्र, विराटने या विजयाचे श्रेय स्वतः न घेता शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)  आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)  यांच्या अंतिम ओव्हर मधील अफलातून फलंदाजीला दिले आहे. शार्दुलच्या या खेळीसाठी विराटने आज एक खास इंस्टाग्राम पोस्ट करून त्याचे कौतुक केले आहे, यात विशेष म्हणजे शार्दुलचे कौतुक करताना विराटने खास मराठीतुन पोस्ट केली आहे. याशिवाय काल सामन्याच्या सरतेशेवटी सुद्धा प्रतिक्रिया देताना विराटने शार्दुल आणि जडेजाच्या भागिदारीचा उल्लेख केला होता. जडेजा आणि ठाकूर यांच्यामुळे अगदी मोक्याच्या क्षणी संघाला मदत झाली, अशा शब्दात विराटने या दोघांचे कौतुक केले होते.

वर्ष 2019 मध्ये टीम इंडियाचे टी-20, वनडेमध्ये वर्चस्व; रोहित शर्मा सह विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांनीही मिळवले पहिले स्थान, वाचा सविस्तर

विराटने इंस्टाग्रामवर शार्दुलसह एक फोटो शेअर करताना या फोटोखाली 'तुला मानला रे ठाकूर' (Tula maanla re Thakur) असे मराठीतून कॅप्शन दिले आहे. विराटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, कर्णधार म्ह्णून आपल्या सहखेळाडूंना विराट देत असणारे प्रोत्साहन फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.

विराट कोहली पोस्ट

 

View this post on Instagram

 

Tula maanla re Thakur 👏😎😄 @shardul_thakur

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्ध सिरीज मध्ये रंगलेल्या मॅच बद्दल बोलायचे झाले तर, ही मालिका रोहित शर्मा च्या शानदार प्रदर्शनाची साक्ष आहे. याशिवाय कॅप्टन कोहली याला देखील या मालिकेत अगदी फॉर्म मध्ये पाहता आले. काल कटक मध्ये झालेल्या मॅचमध्ये विराटला सामनावीर पुरस्कार प्राप्त झाला.