भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील वर्ष 2019 मधील शेवटची मालिका अखेर संपुष्टात आली. भारताने या मॅचमध्ये शानदार फलंदाजी करत विजय मिळवला. या संपूर्ण मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांनी वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सामन्यातदेखील दोंघांनी अपेक्षेप्रमाणेच फलंदाजी केली. दरम्यान, रोहितने या वर्षभर आश्चर्यकारक फलंदाजी केली आणि धावा काढण्यात सातत्य राखले. रोहितने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आणि जगातील अन्य फलंदाजांना मागे ठेवून त्याने या प्रकरणात प्रथम स्थान मिळविले. वनडे आणि टी-20 मध्ये टीम इंडियाने बॅटिंग आणि बॉलिंग आपला दबाव बनवून ठेवला. एकीकडे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले, तर रोहितने वनडेमध्ये विराट आणि विंडीजच्या शाई होप यांना पछाडत अव्वल तहान मिळवले. आहे. (IND vs WI 3rd ODI: कटकमध्ये विराट कोहली याने जॅक कॅलिस यांना टाकले मागे, वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला 'हा' रेकॉर्ड)
विंडीजविरुद्ध मालिकेत रोहितने शानदार प्रदर्शन कायम ठेवले. रोहितने वनडेमध्ये वर्ष 2019 मध्ये सर्वाधिक 1490 धावा केल्या. विराट 1377 धावांसह दुसऱ्या स्थानावर राहीला, तर होपने 1345 धावांसह तिसरे स्थान पटकावले. याशिवाय, यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये (वनडे, टेस्ट आणि टी-20) भारतीय फलंदाजांची वर्चस्व पाहायला मिळाले. विराटने सर्वाधिक 2450 धावा केल्या. त्याच्यामागे रोहित 2442 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे. बाबरने आजवर 2082 धावांची नोंद केली आहे. वनडे गोलंदाजीत देखील भारताकडून मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने अधिराज्य गाजवले. शमीने 21 मॅचमध्ये 42 विकेट घेतल्या आणि तो पहिल्या क्रमांकावर आहे. शमीच्या मागे 20 सामन्यांमध्ये 38 विकेट सह न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (Trent Boult), त्यानंतर न्यूझीलंडचाच लोकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) 17 सामन्यात 35 विकेट घेत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध कटकमधील मॅचबद्दल बोलायचे झाले तर, विंडीजने दिलेल्या 316 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताने रोमांचक विजय मिळवला. टीम इंडियासाठी विराट कोहली, केएल राहुल आणि रोहितने भारताच्या विजयाचा पाया घातला. पण, अखेरीस रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांच्या तुफान फटकेबाजीने संघाला विजय मिळवून दिला.