कोबे ब्रायंट याच्या मृत्यूने बदलाला विराट कोहली याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, न्यूझीलंडविरुद्ध वनडे आधी केले 'हे' भावनिक विधान
Basketball Star Kobe Bryant | (Photo Credits-ANI)

अमेरिकामधील कॅलिफोर्निया येथे हेलिकॉप्टर अपघातात प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू कोबे ब्रायंटचा (Kobe Bryant) मृत्यू झाला आहे. या अपघातात ब्रायंटसह त्यांची 13 वर्षांची मुलगी जियाना (Gianna Bryant) यांच्यासह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. याच्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, "एनबीए (NBA) दिग्गज कोबे ब्रायंटच्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रभावित झाला आहे." दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा आणि आतापर्यंतचा सर्वात सुशोभित बास्केटबॉलपटू असणारा ब्रायंट गेल्या महिन्यात एका हेलिकॉप्टरच्या अपघातात मरण पावला. कोबेच्या निधनाची बातमी काळातच विराटने कोबेचा फोटो शेअर केला आणि लहानपणींची आठवण सांगत म्हटले की कोबेची मॅच पाहण्यासाठी तो सकाळी लवकर उठायचा. (जियाना ब्रायंट, जगप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायंट यांचा 13 वर्षांची मुलगी गियाना मारिया आणि 11 जणांसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, )

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला कोहली म्हणाला की, “पहिले, सर्वांनाच धक्का बसला. मी सकाळी एनबीए गेम्स पहात आणि त्याने कोर्टावर काय केले हे पहात मी मोठा झालो. परंतु जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे प्रेरणादायी मार्गांनी पाहिले, ती अशा प्रकारे निघून जाते तेव्हा त्या गोष्टींना दृष्टीकोनात ठेवतात." कोहली पुढे म्हणाला: “... दिवसअखेर आयुष्य खूप चंचल असू शकते. हे इतके अप्रत्याशित आहे. मला वाटतं बर्‍याच वेळा आपण उद्या काय करायचं या दबावात अडकतो... आपण खरोखर जगणं विसरलो आहोत आणि आपल्या आयुष्याबद्दल फक्त कौतुक आणि आभारी आहोत.” कोहली म्हणाला, यासारख्या शोकांतिकेमुळे एखाद्याला याची जाणीव होते की अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही.

हेलिकॉप्टरमधून जात असताना कोबे यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मुलीसह हेलिकॉप्टरमध्ये एकूण 9 जण होते. या अपघातात सर्व लोक ठार झाले. ब्रायंट 41 वर्षांचा होता, तर त्यांची मुलगी जियाना 13 वर्षांची होती. ब्रायंट 5 वेळा एनबीए चॅम्पियन, तर 2 वेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट राहिला आहे आणि बास्केटबॉलच्या इतिहासातील तो दिग्गज खेळाडू होता. तो सतत दोन दशके लॉस एंजेलिस लेकर्सकडून खेळत राहिला.