अॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्वीव्ह स्मिथ (Steve Smith) याने जोरदार प्रदर्शन केले आहे. स्मिथने भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही उत्तम खेळाडू आहेत. पण विराटआणि स्मिथ यांच्यामधील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण? याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेनवॉर्न (Shane Warne) याने विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याबदल त्याचे मत मांडले आहे.
कसोटी क्रिकेटचा पर्याय निवडल्यास स्मिथ हा कोहलीपेक्षा थोडा पुढे असेल. जर सर्व फॉर्मेटमध्ये चर्चा केली तर, कोहली पुढे असेल. तसेच कोहली हा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulker) 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम विराट कोहलीच मोडेल, असे मत शेनवॉर्न याने व्यक्त केले. विराट आणि स्थिम यांच्या बाबतीत वॉर्न म्हणाला की, "कसोटी क्रिकेटचा विचार केला तर, कोहली आणि स्मिथ यांच्यात निवड करणे फार कठीण जाईल. कसोटी क्रिकेटमध्ये एक फलंदाज निवडायचा असेल तर, स्मिथची निवड करेन.जर मला सर्व फॉर्मेटमध्ये एक फलंदाज निवडायचा असेल तर मी विराटची निवड करीन." वॉर्नच्या दृष्टिकोनातून विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधील महान फलंदाज आहे. हे देखील वाचा- मोहम्मद नबी याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 68 शतके असून 30 वर्षांचा आहे. विराट कोहली हा सचिन तेंडुलकरचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे