मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

Mohammed Siraj Favourite Captain: ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला त्यांच्याच देशात दुसऱ्यांदा पराभूत करत टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीचं जगभरात कौतुक केलं जात आहे. कांगारू संघाविरुद्ध मेलबर्न टेस्ट (Melbourne Test) सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) चमकदार कामगिरी केली आणि आपल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेला संस्मरणीय बनवले. सिराजने संपूर्ण मालिकेत 13 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर हल्ला चढवला. सिराजच्या कामगिरीची चाहत्यांनीच नाही तर बोर्डाने देखील दाखल घेतली आणि आता त्याला इंग्लंडच्या आगामी भारत दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. सिराजने ब्रिस्बेनच्या अंतिम सामन्यात कांगारू संघावर वर्चस्व गाजवलं आणि टेस्टमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी बजावली. आणि भारतात परतल्यावर सिराजने एका पत्रकार परिषदेत बोलताना बर्‍याच गोष्टी उघड केल्या आहेत. जेव्हा त्याला टीम इंडियाच्या कर्णधारांबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की दोन्ही कर्णधार चांगले आहेत. (ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून हैदराबादला परतल्यावर Mohammed Siraj याने वडिलांच्या कब्रला दिली भेट, पहा Photo)

यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तुम्हाला कर्णधार आणि संघाचे सहकार्य कसे मिळाले याबद्दल विचारले गेले असता त्याने म्हटले की, अजिंक्य रहाणे युवांवर अधिक विश्वास ठेवत आहेत. तो म्हणाला की रहाणे 'तू करू शकतो' असा युवा खेळाडूंना आश्वासन देत त्यांचे आत्मबल वाढवत होता. सिराजने अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आणि सांगितले की "सामन्यादरम्यान काही ओव्हर खराब गेली तर तो संतापात नाही, तर तो बऱ्याच चांगल्या पद्धतीने समजावतो. एखाद्या खेळाडूसाठी ही आत्मविश्वासाची गोष्ट असते." या व्यतिरिक्त, जेव्हा त्याला पुन्हा एकदा विचारले गेले, की कोणाच्या नेतृत्वाचा त्याने सर्वात जास्त आनंद घेतला? तेव्हा तो म्हणाला की, मी दोन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाचा आनंद घेतला आहे.

दरम्यान, सिराजने आपल्या पुढील योजनेबद्दल बोलताना सांगितले की, त्याला आणखी कठोर परिश्रम करण्याची इच्छा आहे. सिराज पुढे म्हणाला की, इंग्लंडबरोबर कसोटी मालिका असल्याने त्याला विश्रांती घ्यायची नाही आणि आपली कामगिरी सुरू ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करायचे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू करत सिराजने 3 सामन्याच्या सहा डावांमध्ये 13 विकेट घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजीबद्दल बोलायचे तर त्याने 73 धावांवर पाच गडी बाद केले आहेत.