मीराबाई चानू आणि विराट कोहली (संपादित आणि संग्रहीत प्रतिमा)

देशातील सर्वात मोठा क्रीडा पूरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी आज (सोमवार, १७ सप्टेंबर) खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि कॉमनवेल्थ गेम्स २०१८ची सूवर्ण पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची या पूरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे..

दरम्यान, २०१६मध्येही या पुरस्कारासाठी कोहलीच्या नावाची चर्चा होती. मात्र, तेव्हा त्याला अशा प्रकारचा कोणताही पुरस्कार देण्यात आला नव्हता. मात्र, आता जर त्याला हा पुरस्कार मिळाल तर, सचिन तेंडूलकर (१९९७) आणि महेंद्र सिंह धोनी (२०१७)यांच्यानंतर हा पुरस्कार पटकावणारा हा तिसरा क्रिकेटपटू आणि कर्णधारही असेल.

दुसऱ्या बाजूला मीराबाई चानूने नुकतीच आपली कामगिरी सिद्ध केली आहे. तिने गेल्या वर्षी पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पीयनशिपमध्ये सूवर्ण पदक जिंकले आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने सूवर्णपदक जिंकले आहे. दरम्यान, दुखापतीमुळे ती एशियायी गेम्समध्ये सहभागी होऊ शकली नाही.