भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा मैदानावर एक उत्कृष्ट क्रिकेटरआहे आणि आता कोरोना व्हायरस लॉकडाउन कालावधीत त्याने आपले मैदानाबाहेरील कौशल्य तीव्र केले आहे. भारतीय फलंदाज मयंक अग्रवालबरोबर एका मजेदार मुलाखतीत विराटने खुलासा केला की त्याने वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्का शर्मासाठी (Anushka Sharma) केक बनविला होता. विराट म्हणाला की केक बेक करण्याचा त्याचा पहिला प्रयत्न होता पण निकाल चांगला लागला. कोहलीचा केक अनुष्काला देखील आवडला ज्याने त्याच्या बेकिंग एक्सपेरिमेंटला 'खास' बनवले. "मी अनुष्काच्या वाढदिवशी माझ्या आयुष्यात प्रथमच केक बेक केला. माझ्यासाठी ही एक क्वारंटाइन स्टोरी असेल कारण मी यापूर्वी कधीही बेक केलं नव्हतं. पहिल्याच प्रयत्नात ते चांगलं ठरलं आणि तिने मला सांगितले की तिला केक आवडला, जे खूप खास आहे," विराट कोहलीने मयंक अग्रवालला सांगितले. ('टेस्ट सामना जिंकण्यासाठी एका दिवसात 300 धावा करण्यातून माघार घेणार नाही', टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीचा मोठा दावा)
बीसीसीआयने विराट-मयंकच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा टीजर शेअर केला ज्यात विराटने काही न माहित असलेल्या गोष्टींचा खुलासा केला. दुसरीकडे, जेव्हा सर्वोत्कृष्ट प्रोटीन शेकची तयारी करणाऱ्या टीममेटबद्दल मयंकने विचारले असता विराटने मयंक अग्रवाल, नवदीप सैनी आणि स्वत: चे नाव घेतले. विराट म्हणाला, "तू मला असे का विचारतोस हे मला माहित आहे. मी सांगेन तू मग नवदीप सैनीही चांगला आहे आणि मग मी स्वत: ला रेट करेन."
पाहा विराट-मयंकच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ:
From baking for his special someone in the lockdown to revealing the best smoothie makers in the team, @imVkohli answers it all on #OpenNetsWithMayank.
Part 2 of the show coming up soon on https://t.co/Z3MPyesSeZ. Stay tuned 😊😊@mayankcricket pic.twitter.com/IuvdfOST0Y
— BCCI (@BCCI) July 26, 2020
दरम्यान, आयपीएल 2020 तारखांची पुष्टी झाल्याने विराट युएई येथे 19 सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या आवृत्तीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आयसीबी) नेतृत्व करणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी आजवर आयपीएलची प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला आहे आणि 2020 आयपीएलमध्ये कोहली हे चित्र नक्कीच बदलू इच्छित असेल.