भारताचे गृहमंत्री अमित शाह आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट अससोसिएशन, डीडीसीए (DDCA)चे अध्यक्ष रजत शर्मा यांच्या उपस्थितीत दिल्लीचे प्रसिद्ध फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे नाव देण्यात आले आहेत. याशिवाय, विराट कोहली (Virat Kohli) याच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाचे स्मरणार्थ फिरोजशाह कोटला (Feroz Shah Kotla) स्टेडियमच्या नवीन स्टॅन्डला नाव विराटचे देण्यात आले आहे. या मैदानाशी विराटचे जवळचे नाते आहे आणि इथे त्याने बरेच क्रिकेट खेळले आहेत. गुरुवारी डीडीसीएने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कोहली फारच भावनिक झालेला दिसला आणि जुन्या आठवणींमध्ये रमला. (दिल्लीचे फिरोजशाह कोटला स्टेडियम आता बनले अरुण जेटली स्टेडियम, विराट कोहली स्टॅन्ड चे झाले अनावरण)
जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात कोहली म्हणाला, "एवढा मोठा सन्मान होईल असे मला कधी वाटले नव्हते. काय बोलावे ते समजू शकत नाही कारण माझे कुटुंब, पत्नी, भाऊ आणि वाहिनी सर्व येथे आहेत." जुन्या आठवणींना उजाळा देत कोहली म्हणाला की, "2001 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यादरम्यान, माझे बालपणचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी मला दोन तिकिटे दिली होती. ते म्हणाले, मला आठवते की जवागल श्रीनाथ याच्या ऑटोग्राफसाठी मी गॅलरी ओलांडली होती. मी पॅव्हिलिअन स्टँडमध्ये बसलो होतो. सेहवाग, युवी पाजी, श्रीनाथ सीमारेषेवर उभे होते. आणि मी त्यांना ऑटोग्राफसाठी विचारले. आज याच स्टेडियममध्ये माझ्या नावाचे स्टॅन्ड असणे हे स्वप्नासारखे आहे. हा एक मोठा सन्मान आहे."
Thank you @delhi_cricket and @BCCI for bestowing this honour upon me. The pavilion will remind me of my journey in life and in cricket but most importantly I hope it will serve as an inspiration for the next generation of young cricketers of our nation.
— Virat Kohli (@imVkohli) September 12, 2019
या कार्यक्रमादरम्यान कोहलीच्या अंडर-19 संघ ते भारताच्या कर्णधारपदापर्यंतच्या प्रवासावर अॅनिमेशन फिल्म दाखविण्यात आली. कार्यक्रमात संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ आणि सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. कोहलीने माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासोबतच्या आठवणीदेखील सांगितल्या. कोहली म्हणाला, "माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी, ते माझ्या घरी आले होते आणि मला धीर दिला होता."