Happy Birthday AB De Villiers: विराट कोहली ने Birthday Boy एबी डिविलियर्स ला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा Tweet
Virat Kohli (Photo Credits: IANS)

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करीत आहे. अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स हा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे ज्याने शालेय स्तरावर वेगवेगळ्या खेळांमध्ये वर्चस्व गाजवले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या मैदानात उतरताना त्याने एकापेक्षा जास्त विक्रमाची नोंद केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला डिव्हिलियर्स लवकरच टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. डिव्हिलियर्स फक्त फलंदाजीनेच नाही तर त्याच्या फिल्डिंगनेही विरोधी संघाला मुश्किलीत पाडू शकतो. मिस्टर 360 डिग्रीच्या नावाने एबी क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच इंडियन क्रिकेट लीग (आयपीएल) मध्ये एबीने सर्वोत्कृष्ट खेळ केला आणि मोठ्या षटकारांसह लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्यालाट्विटर वरून शुभेच्छा दिल्या.

'भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपणास सर्व आनंद आणि चांगले आरोग्य आणि कुटुंबासाठी भरपूर प्रेम आहे. लवकरच भेटू, विराटने ट्विट करून लिहिले. बर्‍याचदा दोघांनी एकत्र त्यांच्या संघासाठी सर्वोत्कृष्ट खेळ केला, तर डीव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स एकट्याने विजय मिळावून दिला आहे.  पाहा: 

डिव्हिलियर्सने केवळ 31 चेंडूत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावले. याशिवाय, 30 व्या षटकानंतर दोनदा फलंदाजी करताना डिव्हिलियर्स शतक ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. विलीयर्सने 78 आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यात 1672 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 26.12 आणि स्ट्राइक रेट 135.16 आहे. नुकताच तो बिग बॅश लीग (बीबीएल) मध्ये ब्रिस्बेन हीटकडून खेळताना दिसला. 2018 मध्ये आयपीएलनंतर डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, पण मंगळ वर्षी विश्वचषकपूर्वीच त्याच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते. आणि तो लवकरच संघातून बाहेर पडल्यानंतर आफ्रिकन संघाचा संघर्ष सुरू झाला.