Virat Kohli Captaincy: नुकतेच कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठे वक्तव्य केले आहे. कोहली म्हणाला, “नेत्या”ची भूमिका बजावण्यासाठी एखाद्याला ‘टीम लीडर' बनण्यासाठी कर्णधार असण्याची गरज नाही. रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताच्या व्हाईट-बॉल संघांचे नेतृत्व हाती घेतल्यावर कोहलीने आता गेल्या सहा महिन्यांत सर्व कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने 2014 पासून कसोटीत भारताचे नेतृत्व केले आहे आणि 2017 मध्ये एमएस धोनीकडून पूर्णवेळ नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 1-2 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तर गेल्या वर्षी 33 वर्षीय खेळाडूने टी-20 कर्णधापदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. (Virat Kohli ने ‘या’ दिग्गजाला IPL 2021 वेळीच सांगितला होता कर्णधारपद सोडण्याचा निर्णय; माजी वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराने उघडकीस केली कोहलीसोबतची चर्चा)
“मला वाटतं तुम्ही काय साध्य करायचे आहे आणि तुम्ही ती लक्ष्ये साध्य केली आहेत की नाही याची प्रथम तुम्हाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचा कार्यकाळ आणि कालावधी असतो त्यामुळे तुम्हाला त्याची जाणीव असणे आवश्यक आहे. एक फलंदाज म्हणून. , तुम्ही संघाला आणखी काही देण्यास सक्षम असाल, त्यामुळे त्याचा अभिमान बाळगा,” कोहली ‘Fireside Chat with VK’ च्या एका एपिसोडवर म्हणाला. “टीम लीडर होण्यासाठी तुम्हाला कर्णधार असण्याची गरज नाही. जेव्हा एमएस धोनी संघात होता तेव्हा असे नव्हते की तो नेता नव्हता, तो अजूनही तोच व्यक्ती होता ज्याच्याकडून आम्हाला इनपुट हवे होते. जिंकणे किंवा न जिंकणे आपल्या हातात नाही, उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे आणि दररोज चांगले बनणे, ही अशी गोष्ट नाही जी आपण अल्पावधीत करू शकता. जेव्हा एखाद्या संस्कृतीचा विचार केला जातो, तेव्हा ते तुमच्या खेळण्याच्या वर्षांच्या आणि तुमच्या जबाबदारीच्या पलीकडे टिकते,” तो पुढे म्हणाला.
उल्लेखनीय आहे की कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नाही आणि ऑस्ट्रेलियात पहिली-वहिली कसोटी मालिका जिंकली. गेल्या वर्षी भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड दौऱ्यावर 2-1 ने आघाडी घेतली ज्यामधील पाचवी कसोटी कोविड-19 च्या धोक्यामुळे ढकलली. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत कोहली प्रभारी कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात खेळला आणि दोन अर्धशतके ठोकली पण भारताने मालिका 0-3 ने गमावली. आता फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आगामी वनडे आणि टी-20 मालिकेत तो रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना दिसेल.