विराट कोहली (Photo Credit: PTI)

Virat Kohli Test Captaincy: ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज आणि वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) नुकताच खुलासा केला आहे की माजी भारतीय दिग्गज कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) गेल्या वर्षी व्हाईट-बॉल संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होण्याबाबत चर्चा केली होती. पॉन्टिंग म्हणाला की, कोहलीला कसोटी कर्णधार म्हणून आपल्या कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे, विशेषत: ज्याप्रकारे त्याने टी-20 क्रिकेटच्या युगातील सर्वात लांब फॉरमॅटला प्राधान्य दिले. कोहलीने 68 पैकी 40 कसोटी जिंकून भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून कारकीर्द संपुष्टात आणली. कोहलीच्या नेतृत्वात भारताने मायदेशात कधीही कसोटी मालिका गमावली नाही आणि ऑस्ट्रेलियात त्यांची पहिली-वहिली मालिका जिंकली. तथापि, दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावल्याच्या एका दिवसानंतर भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर कोहलीच्या निर्णयाने अनेक भुवया उंचावल्या. (विराट कोहलीच्या कसोटी कर्णधार उत्तराधिकारीच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे भाष्य, म्हणाले- ‘अजिंक्य रहाणे आवडेल, पण...’)

“विराटच्या आधी तुम्ही भारताचा विचार केला तर, ते मायदेशात बरेच सामने जिंकण्याबद्दल होते आणि परदेशात तितके जिंकले नव्हते. भारताने परदेशात आणखी काही सामने जिंकणे ही सर्वात सुधारलेली गोष्ट होती, आणि हे असे आहे की त्याला आणि सर्व भारतीय क्रिकेटला खरोखरच अभिमान वाटले पाहिजे,” पॉन्टिंगने आयसीसीला सांगितले. “दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा विराटने पदभार स्वीकारला तेव्हा बीसीसीआयने कसोटी क्रिकेटवर खरोखरच लक्ष केंद्रित केले होते आणि मला वाटते की त्याच्याकडूनही बरेच काही आले आहे -  कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि परदेशात व देशात अधिकाधिक सामने जिंकणे. कर्णधार म्हणून त्याचा कसोटी रेकॉर्ड पाहता, त्याने जे काही साध्य केले त्याचा खूप अभिमान बाळगून तो या भूमिकेपासून दूर जाऊ शकतो.”

दरम्यान, पॉन्टिंगने उघड केले की त्याने मार्च-एप्रिल 2021 मध्ये विराट कोहलीने त्याच्याशी व्हाईट-बॉल संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत चर्चा केली होती. तथापि त्याने पुढे सांगितले की, जेव्हा कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा तो “खूप, खूप आश्चर्यचकित” झाला होता, 2021 च्या त्यांच्या चर्चेत कोहलीने त्याला भारताच्या कसोटी कर्णधारपदाची भूमिका किती आवडते हे सांगितले होते. तथापि, जागतिक चषक विजेत्या माजी कर्णधाराने सांगितले की तो समजू शकतो की कोहलीने कसोटी संघाची धुरा का सोडली असेल.