Virat Kohli (photo Credit - Twitter)

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) याआधी भारतात परतला होता पण बातमीनुसार तो वेळेवर दक्षिण आफ्रिकेत परतेल आणि पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. कोहलीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट असून, पहिल्या कसोटीत त्याला विक्रमाच्या यादीत राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) मागे टाकण्याची सोपी संधी असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 सामन्यांच्या 24 डावात 1236 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत त्याने 3 शतके झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू सध्या सचिन तेंडुलकर आहे. त्यांच्यानंतर या यादीत वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड आहेत, पण कोहलीला फक्त 71 धावांची गरज आहे आणि तो या दोन फलंदाजांना मागे टाकेल.

सचिन तेंडुलकर सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने 45 डावात 1741 धावा केल्या आहेत. सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1306 तर राहुल द्रविडने 1252 धावा केल्या आहेत. राहुल द्रविड सध्या भारतीय क्रिकेट संघाशी मुख्य प्रशिक्षक म्हणून संबंधित आहे. विराट कोहलीने केवळ 17 धावा केल्या तर तो या यादीत राहुल द्रविडला मागे टाकेल आणि 71 धावा करून तो वीरेंद्र सेहवागला मागे टाकेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत तो विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर येईल. (हे देखील वाचा: Year Ender 2023: कसोटी क्रिकेटमध्ये 'या' दिग्गज फलंदाजांनी यावर्षी केला कहर, केल्या सर्वाधिक धावा; येथे पाहा संपूर्ण यादी)

सचिन तेंडुलकर: 1741

वीरेंद्र सेहवाग: 1306

राहुल द्रविड: 1252

विराट कोहली: 1236

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होत आहे. त्यानंतर दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर सुरू होईल. कसोटी मालिकेसाठी भारताचा हा 9वा दौरा आहे आणि भारताने दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही.