टीम इंडियाच्या भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन सोहळा सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज संघावर सहा गडी राखून एकदिवसीय सामन्यासह मालिका खिशात घातली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात विराटने (Virat Kohli) नाबाद 114 धावांची दमदार खेळी करत त्याचे वन डेमधील 43 वे शतक (ODI Century) ठोकले आहे. सोबतच क्रिकेट विश्वातले महत्त्वाचे रेकॉर्डही मोडले आहे. यामध्ये रिकी पॉंटिंगचा (Ricky Ponting) एका दशकात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम विराटने मोडला आहे. कोहलीच्या एका दशकातील धावसंख्या 20003* आहेत, तर पॉंटींगच्या नावावर ही धावसंख्या 18962 होती. IND vs WI 3rd ODI: विराट कोहलीचे शतक, श्रेयस अय्यरचे अर्धशतक; टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा 6 विकेट्स ने धुव्वा, मालिकेत 2-0 ने विजयी
कालच्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्यामध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत 240 धावा केल्या. डकवर्थ लुइस नियमानुसार टीम इंडियाला 255 धावांचं लक्ष्य होतं. हे लक्ष्य टीम इंडियाने 4 गडी गमावत 32.2 ओव्हर्समध्ये पार केलं. विराट कोहलीने 99 बॉल्समध्ये 14 चौकार ठोकत 114 धावा काढल्या. कालच्या सामन्यात विराट नाबाद राहिला. टीम इंडियाची रनमशीन अशी ओळख असलेल्या विराटवर त्याच्या या दमदार खेळीमुळे आणि रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे कौतुक होत आहे.
विराटचं कौतुक करणारी काही ट्विट्स
Dozed off thinking match had been rained off. Woke up to find @imVkohli had delivered another masterclass century to win series for India. Doubts that he is best ODI batsmen ever eroding rapidly!
— Cricketwallah (@cricketwallah) August 15, 2019
At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to another Virat Kohli hundred #WIvIND
— Gaurav Kalra (@gauravkalra75) August 15, 2019
Staying up at 3:40am hasn’t felt better! @imVkohli thanks for another special 100!
— Danish Sait (@DanishSait) August 14, 2019
The Bi-lateral Series Legend #ViratKohli
Dear @imVkohli did you see how Shreyas Iyer played this tournament? Yes infact this tournament was for them to make chance in team
You, Sharma and Dhawan should've stayed home.#playforrecords
— Om_the_unstoppable (@LumbhaniOm) August 15, 2019
वेस्ट इंडीजविरुद्ध विराट कोहलीने काल ठोकलेलं हे नववं शतक आहे. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतकांच्या विक्रमात आता विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.