IND vs WI 3rd ODI: विराट कोहलीचे शतक, श्रेयस अय्यरचे अर्धशतक; टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा 6 विकेट्स ने धुव्वा, मालिकेत 2-0 ने विजयी
श्रेयस अय्यर (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारतीय क्रिकेट टीमचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे शतक आणि युवा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा विकेट्सने धुव्वा उडवला. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत भारताने 3- सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. याआधी पाहिली वनडे पावसामुळे रद्द झाली तर दुसऱ्या वनडेत भारताने विंडीजला पराभूत केले होते. यंदाच्या मालिकेत भारतासाठी विराटने वनडे मालिकेत दुसरे शतक केले आणि संघाला विजय मिळवून दिला. विराटला चांगली साथ मिळाली ती श्रेयसची. विराटचे आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये हे 43 वें शतक आहे. आघाडीचे फलंदाज आणि चौथ्या क्रमांकावरील रिषभ पंत बाद झाल्यावर श्रेयसने विराटला पुन्हा एकदा चांगली खेळी करत साथ दिली आणि संघाच्या विजयात आपले योगदान दिले. याआधी देखील या दोन्ही खेळाडूंनी संगःला दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवून दिला होता. (IND vs WI 3rd ODI: रिषभ पंत याने पुन्हा बहाल केली विकेट, सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला राग)

भारत आणि विंडीजमधील तिसऱ्या आणि निर्णायक सामान्य यजमान संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने टॉस जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर क्रिस गेल (Chris Gayle) आणि एव्हिन लुईस (Evin Lewis) यांनी केलेल्या तुफानी भागादारीच्या जोरावर विंडीजला निर्धारित 35 ओव्हरमध्ये 7 बाद 240 धावा करता आल्या. त्यानंतर टीम इंडियाला डकवर्थ-लुईस नियमानुसार 35 ओव्हरमध्ये 255 धावांचे आव्हान देण्यात आले. पावसाचा व्यत्यय आल्याने 35 ओव्हरचा खेळवण्यात आलेल्या या लढतीत विंडीजला चांगल्या सुरुवातीनंतर तिचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. गेलने 41 चेंडूत 72 धावांची आतिषबाजी केली. त्याने लुईसच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 11 ओव्हरमध्येच 115 धावांची भागीदारी केली.

मिळालेल्या धाव संख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त 10 धावा करत धाव बाद झाला. त्यानंतर वीर ने शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, धवन जास्त काळ विराटला साथ देऊ शकला नाही आणि 36 धावा करून माघारी परतला. रिषभ पंत (Rishabh Pant) देखील पहिल्याच चेंडूत बाद झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयसने 65 धावा केल्या आणि विराटच्या साथीने 120 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले.