केरळच्या (Kerala) मलप्पुरममध्ये गर्भवती मादी हत्तीसोबत लोकांनी जे केले ते माणुसकीला काळिमा फासणारे होते. गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच्या (Killing of A Pregnant Elephant) घटनेने साऱ्यांनाच हादरून टाकले आहे. मंगळवारी काही स्थानिक लोकांनी फटाक्यांनी भरलेला अननस हत्तीणीला खायला दिला. त्यानंतर त्या हत्तीणीचा पाण्यात उभ्या उभ्या मृत्यू झाला.अनेक सेलिब्रेटींनीही या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. दरम्यान, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे. यातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेवर संताप व्यक्त केला असून प्राण्यांनाही प्रेमाची वागणूक मिळायला हवी, असे आवाहन केले आहे.
प्राण्यांसोबत क्रूरतेचा व्यवहार केल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र, मंगळवारी केरळच्या मलप्पुरममध्ये गर्भवती हत्तीणीसोबत जे झाले त्याने माणुसकीलाही लाजवले. येथील स्थानिक लोकांनी खूप क्रूरपणे तिची हत्या केली. या हत्तीणीला खायला तेथील लोकांनी फटाक्यांनी भरलेला अननस दिला. यामुळे या हत्तीणीचा मृत्यू झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. हे देखील वाचा- George Floyd Death: डॅरेन सॅमी याची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICC कडे मागणी, क्रिकेट मंडळांनीही केले आवाहन
विराट कोहलीचे ट्वीट-
Appalled to hear about what happened in Kerala. Let's treat our animals with love and bring an end to these cowardly acts. pic.twitter.com/3oIVZASpag
— Virat Kohli (@imVkohli) June 3, 2020
केरळच्या सायलंट व्हॅली नॅशनल पार्कचे वॉर्डन सॅम्युअल पचाऊ यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली होती. “या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांचा आम्ही शोध घेऊ. एखाद्या प्राण्याची हत्या करणे गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना पकडल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.” असेही ते म्हणाले आहेत.