विराट कोहली (Photo Credit: @imVkohli/Twitter)

सोशल मीडियावर सध्या अनेकांना 'बॉटल कॅप चॅलेंज'चे बेड लागले आहे. युवराज सिंह, शिखर धवन, जोफ्रा आर्चर यांनी युद्ध हे चॅलेंज स्वीकारत स्टाईलमध्ये पूर्ण देखील केला आहेत. आणि आता यांच्यापाठोपाठ टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील बॉटल कॅप चॅलेंजच्या मैदानात उतरला आहे. भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. याआधी टी-20 मालिका जिंकली होती. त्यानंतर पहिले वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्यावर कोहलीने सोशल मीडियावर 15 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत हे चॅलेंज पूर्ण केले आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन देत लिहिले की, 'कधीही न करण्यासाठी उशिरा केलेले चांगले' #bottlecapchallenge.(IND vs WI 2nd ODI: विराट कोहली याने मोडला पाकिस्तानी जावेद मियाँदाद यांचा 26 वर्ष जुना रेकॉर्ड, वेस्ट इंडिजविरुद्ध केल्या इतक्या धावा)

भारत आणि विंडीजमधील पहिले वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने विराटने आपली निराशा व्यक्त केली होती. कोहली क्रिकेटच्या मैदानात रिव्हर्स शॉट खेळताना फार कमी वेळा दिसतो. पण, यंदा विराटने रिव्हर्स शॉट खेळत बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. विराटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली हातात बॅट घेऊन बॉटलकडे पाहत आहे. यानंतर तो बॅटने बॉटलचे कॅप उघडतो. शिवाय, या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी कॉमेंट्री केली आहे. बॉटलचे कॅप हटवल्यानंतर कोहली त्या बाटलीतील पाणी पिताना दिसत आहे. पहा हा व्हिडिओ:

दरम्यान, धवन आणि युवराजने त्यांच्या बॅटच्या शॉटने बाटलीची कॅप उडवली आणि बाटलीदेखील खाली पडली नाही. उल्लेखनीय म्हणजे याआधी सलमान खान (Salman Khan) यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकारांनी देखील आपल्या अनोख्या शैलीत बाटली कॅप चॅलेंज स्वीकारत ते पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.