Vinod Kambli | (Photo Credit: Youtube)

Vinod Kambli Health Update: मी पुनर्वसन केंद्रात जाण्यास तयार आहे. मला तिथे जायचे आहे कारण मला कशाचीही भीती वाटत नाही. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे. माझे मित्रही मला मदत करत आहेत, असे भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli News) यांनी म्हटले आहे. युट्यूबवर विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. अगदी अलिकडेच काही दिवसांपूर्वी रमाकांत आचरेकर स्मारक (Ramakant Achrekar Memorial) कार्यक्रमाला विनोद कांबळी यांनी हजेरी लावली. त्या वेळी त्यांची शारीरिक अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या या क्रिकेटपटूस अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यावर मुलाखीत बोलताना या खेळाडूने सविस्तर भाष्य केले आहे.

पत्नी आणि मुलांचा भक्कम पाठिंबा

युट्यूबला दिलेल्या मुलाखतीत, विनोद कांबळीने त्याची पत्नी अँड्रिया, मुलगा जीसस क्रिस्टियानो आणि मुलगी जोहाना त्यांच्या पाठीशी कशी उभी राहिली हे सांगून त्यांच्या अग्निपरीक्षेचा तपशील सामायिक केला. "मी आता बरा आहे. माझी पत्नी माझी खूप काळजी घेते. तिने मला तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेले आणि सांगितले, 'तुला तंदुरुस्त व्हावे लागेल.' जेव्हा मी कोसळलो तेव्हा माझ्या मुलाने मला उचलले आणि माझी मुलगी आणि पत्नीने मला पूर्ण पाठिंबा दिला. डॉक्टरांनी मला पुनर्वसन केंद्रात दाखल होण्याचा सल्ला दिला ", असे कांबळी यांनी सांगितले. (हेही वाचा, Vinod Kambli On Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरवर विनोद कांबळीचे मोठे वक्तव्य, सांगितले की मदत केली की नाही?)

पुनर्वसनासाठी तयार

आरोग्याच्या समस्येवर मात करण्याचा निर्धार करुन विनोद कांबळी यांनी म्हटले की, मी पुनर्वसन केंद्रात जायला तयार आहे. मला तिथे जायचे आहे. कारण मला बरे व्हायचे आहे. मला कशाहीची भीती वाटत नाही. माझे कुटुंब माध्या सोबत आहे, असेही तो म्हणाला.

विनोद कांबळी यांनी उलघडले आयुष्यातील अनेक पैलू

सचिन तेंडूलकर यांच्यासोबतचे पुन्हा ऋणानुबंध

आचरेकर स्मारक कार्यक्रमात सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी दोघेही उपस्थित होते. या वेळी सचिनने कांबीळी यांची भेट घेतली असता तो अत्यंत कृष असल्याचे लक्षात आले. मात्र, या दोन मित्रांच्या भेटीनंतर त्यांच्यातील अंतर कमी होऊन पुन्हा एकदा नवे संबंध सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली. दोघेही खेळाडू एकाच वेळी क्रिकेटमध्ये आले. सन 1988 मध्ये शाळेतील सामन्यात 664 धावांच्या जागतिक विक्रमी भागीदारीसाठी ओळखले जाणारे कांबली आणि तेंडुलकर यांच्यात मैदानावर आणि मैदानाबाहेर मैत्रीचा एक दमदार पूल दर्शवला होता.