Video: IPL पूर्वी एमएस धोनी रांचीमध्ये करतोय शेती; टरबूज, पपईची लागवड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
महेंद्र सिंह धोनी (Photo Credits: Facebook)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) तब्बल आठ महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे विश्वचषकच्या सेमीफायनल सामन्यातून बाहेर पडल्यावर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही आणि धोनी आता 29 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) पासून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 2020 आयपीएलमध्ये पुन्हा एकदा उठावदार कामगिरी करण्यासाठी धोनी उत्सुक असेल. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार धोनी 2 मार्च रोजी संघात सामील होईल. आयपीएल (IPL) सुरू होण्यापूर्वी धोनीचा सोशल मीडियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो सेंद्रिय शेती आणि खरबूज आणि पपईची लागलेत करण्याचं शिकत आहे. धोनीने खुद्द हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. (IPL 2020 पूर्वी एमएस धोनी झाला ट्रोल, चाचा ने विचारलेल्या 'तुम्हारा वाला खेल पाएगा?' च्या प्रश्नावर CSK ने दिलेली प्रतिक्रिया तुमच्या चेहऱ्यावर आणेल हसू)

धोनीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो एका वेगळ्याच रूपात दिसत आहे. शेती सुरू करण्यापूर्वी धोनी पूजा करताना दिसत आहे. यावेळी तो बी पेरण्यापूर्वी पेरणीच्या ठिकाणी धूप जाळली आणि नारळ फोडला. धोनीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "रांचीमध्ये 20 दिवसांत खरबूज आणि पपईची सेंद्रिय शेती सुरू केली आहे, पहिल्यांदा मी खूप उत्साही आहे." धोनीने आता निवृत्तीच्या योजनेवर काम सुरू केले असल्याचे म्हटले जात आहे. पाहा व्हिडिओ:

क्रिकेटपासून दूर असलेल्या माहीने आयपीएलची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी त्याने रांचीच्या झारखंड क्रिकेट असोसिएशन (जेएससीए) स्टेडियमला भेट दिली आणि तासंतास सराव केला. आयपीएलची सुरुवात 29 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्समधील सामन्यासह होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीएस विश्वनाथन म्हणाले की, धोनी उपलब्ध खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेईल, तर संघाचा शिबिर 19 मार्चपासून सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीसह सुरेश रैना आणि अंबाती रायडूसारखे खेळाडू दोन आठवडे सराव करतील. यानंतर, ते ब्रेक घेईल आणि मग परत येईल.