सीएसकेने शेअर केला धोनीचा फोटो (Photo Credit: Twitter/ChennaiIPL)

इंडियन प्रीमियर लीग 2020 (Indian Premier League) 29 मार्च रोजी सुरू होणार आहे. पहिला सामना गटजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) मध्ये होणार आहे. यापूर्वी आयपीएलची (IPL) एक जाहिरात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक काका, टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा फोटो बघून म्हणतात, "खेल पाएगा.?" त्यानंतर धोनीची फ्रॅन्चायसी चेन्नई सुपर किंग्जने (CSK) असे उत्तर दिले आहे, ते पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. आगामी हंगामासाठी सर्व कसून तयारीला लागले आहे. आता आयपीएल सुरू होण्यास सुमारे एक महिना शिल्लक आहे आणि त्याची जाहिरात सुरू झाली आहे. आयपीएलच्या पहिल्या 12 हंगामांच्या जाहिरातीही खूप मजेशीर ठरल्या. या सर्जनशील जाहिरातींनी चाहत्यांच्या उत्साहात आणि मोरंजनात भर पडली आहे. या जाहिराती देखील याची आठवण करून देतात की या स्पर्धेत दर्शकांचे भरपूर मनोरंजन होईल. (IPL 2020 Full Time Table: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा घडणार काहीतरी नवीन, पूर्ण शेड्यूल जाणून घ्या)

दरम्यान, यंदाच्या जाहिरातीतून धोनीसह सर्व कर्णधारांची खिल्ली उडवण्यात आली आहे. आयपीएलच्या जाहिरातींमध्ये धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या स्टार क्रिकेटरसारखे दिग्गज आहेत. आयपीएलच्या नवीन जाहिरातीमध्ये ऑफिसमधील एका वयस्कर माणसाला पाहून दुसरा व्यक्ती म्हणतो, "काका अजून किती खेचणार?" यावर तो वयस्कर व्यक्ती म्हणतो, "आम्ही खेचू. धोनी खेळू शकेल का?" याच्यावर सोशल मीडिया यूजर्स म्हणाले की "धोनीही खेळेलही आणि मारणारही..." या व्हिडिओनंतर चेन्नई सुपर किंग्जने एक फोटो जाहीर केला आहे. जे पाहून धोनीच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. पाहा:

सीएसके

दरम्यान, आयपीएलपूर्वी 1 मार्चपासून धोनी सरावासाठी मैदानात उतरणार आहे. 2019 विश्वचषकमधील सेमीफायनल सामन्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावला आहे. धोनी निवृत्ती कधी स्विकारणार या चर्चांना उधाण आलेलं असतानाही त्याने ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकामध्ये खेळावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. धोनीचंटी-20 विश्वचषकमध्ये खेळणं त्याच्या आयपीएल फॉर्मवर अवलंबून आहे.