डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) बहुतेक क्रीडा मालिका निलंबित झाले किंवा रद्द झाल्याने अनेक क्रीडापटूंनी स्वत:ला सेल्फ-आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. अशा स्थितीत हे क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबियांसमवेत अलग वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) सुद्धा वेगळ्या पद्धतीने कॅचचा सराव करताना दिसला. वॉर्नरने आपल्या अंगणात टेनिस रॅकेटसह कॅचचा सराव करताना मंगळवारी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरूवात होण्यापूर्वी वॉर्नरने आपले कॅचिंग कौशल्य सुधरावयाचा एक अनोखा मार्ग शोधला. वॉर्नरने आपल्या मुलीबरोबर घरामागील अंगणात टेनिस रॅकेटसह सराव केला. येथे त्याने टेनिस बॉलचा वापर केला आणि त्याने कॅच पकडण्याचे कौशल्याला अजून धारदार केले. (Video: शिखर धवनने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचे केले आवाहन, मुलगा Zoravar सोबतचा मजेदार व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल)

व्हिडिओ शेअर करताना वॉर्नरने कॅप्शनमध्ये लिहिले की,"बस एका हाताने कौशल्य मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मऊ हात लक्षात ठेवा." याशिवाय, सोमवारीही वॉर्नरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, जेथे तो मुलगी इंडीला हात धुण्याचे आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगताना दिसला. जगभर पसरलेल्या या आजाराच्या स्थितीत वॉर्नर सध्या घरी बसून कुटुंबासोबत वेळ घालवून वेळेचा योग्य वापर करत आहे. जगभर पसरलेल्या कोविड-19 मुळे आजवर तब्बल 16,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी, सर्व खेळांमधील कित्येक खेळाडू त्यांच्या चाहत्यांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या सेल्फ-आयसोलेशनमधील उपक्रमांची माहिती देत फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत आहेत. साधारणत: वर्षाच्या या वेळी क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीत व्यस्त असतात. जगातील सर्व क्रिकेटपटूनि स्वत:ला अलिप्त ठेवले आहेत आणि म्हणून घरी बसून ते त्यांना तंदुरुस्त ठेवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत.

 

View this post on Instagram

 

Just trying to keep up the skills with some one hand catching. Remember soft hands 😂 #Bullsdaycare

A post shared by David Warner (@davidwarner31) on

दुसरीकडे, आयपीएलमध्ये वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2020 29 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आले. शिवाय, व्हिसा बंदीमुळे परदेशी खेळाडूंना भारत प्रवास करणे अशक्य झाले आहे. यानंतर वॉर्नरच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर संभ्रम होता, पण त्याच्या व्यावसायिकाने अलीकडेच याची खात्री केली होती की परिस्थिती सुधारल्यास वॉर्नर आयपीएलमध्ये सहभाग घेईल.