Urvashi Rautela's Reaction on Hardik Pandya's Engagement Post: भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या याने अलीकडेच त्याच्या सर्व चाहत्यांना नवं वर्षाचं सरप्राईज दिलं. सर्बियन अभिनेत्री, मॉडेल नताशा स्टॅनकोविच (Hardik Pandya and Natasa Stankovic) हिच्याशी साखरपुडा करत सर्वांनाच चकित केले. या दोघांच्या साखरपुड्याच्या बातमी पसरताच अनेकांनी हार्दिकला शुभेच्छा दिल्या. परंतु, त्याची रुमर्ड एक्स गर्लफ्रंड उर्वशी रौतेला हिच्या कमेंटने मात्र सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी हार्दिक आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र उर्वशीने या नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
उर्वशीने हार्दिकच्या पोस्टवर उत्तर देत कमेंट केली की, “साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेम आणि आनंद आपल्या नात्यात सदैव राहो. तुमच्या या नव्या नात्यासाठी, मी तुम्हा दोघांनासाठी आनंदी आणि कधीही न संपणाऱ्या प्रेमाच्या शुभेच्छा व्यक्त करते."
हार्दिकने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नताशाशी केलेल्या साखरपुड्याची माहिती दिली होती. हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले, 'मैं तेरा, तू मेरी जान, सारा हिंदुस्तान 01.01.2020.' 'हार्दिक आणि नताशाच्या एंगेजमेंट फोटोंमुळे इंटरनेटवर चर्चांना उधाण आलं होतं. या नव्या कपलने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या चाहत्यांसह एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.
बॉम्बे टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, "वाद वाढवण्याऐवजी दोन लोक एकमेकांवर प्रेम करत असतील तर आपण ते साजरे केले पाहिजे." उर्वशी असंही म्हणाली की, "आमच्यातील बॉन्डिंग खूपच चांगलं होतं आणि एक मैत्रीण म्हणून त्या दोघांच्याही आयुष्यात सुख नांदो एवढीच अशा मी करते."
उर्वशीला तिचे नताशाबद्दल असलेले मत काय आहे असे विचारले असता, ती म्हणाली, 'मी नताशाला व्यक्तिशः ओळखत नाही. मी जेव्हा पागलपंती या चित्रपटाचे प्रमोशन करत होतो तेव्हा एकदाच मी तिले भेटले होते. आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच बोललो नाही. मला खात्री आहे की ती नक्कीच एक चांगली व्यक्ती आहे."