केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) पुढील महिन्यात 17 ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे आणि त्याच्या जवळपास एक महिना शिल्लक असताना टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या एका निर्णयाने सर्वांना चकित केले. विराटने 16 सप्टेंबर (गुरुवारी) रोजी सोशल मीडियाद्वारे घोषणा केली की, वर्ल्ड कप 2021 स्पर्धेनंतर तो टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. विराटने नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक झळकावले नाही आणि त्याच्या कर्णधारपदाचा परिणाम आता त्याच्या फलंदाजीवर होऊ लागला आहे. याशिवाय आता असे संकेतही मिळत आहे की त्याला वनडेमधेही (ODI) अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते आणि तो या फॉरमॅटचे कर्णधारपदही सोडू शकतो. कोहलीबाबत आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कोहलीने रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडे संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्याचा प्रस्ताव निवड समितीला दिला होता, असा दावा पीटीआयच्या अहवालात करण्यात आला आहे. (Virat Kohli नंतर टीम इंडियाचा T20 कर्णधार कोण बनणार? Rohit Sharma च नाही तर या खेळाडूंमध्येही आहे भरपूर दम)

PTI ने दिलेल्या माहितीनुसार, कोहलीने निवड समितीशी संपर्क साधून रोहित 34 वर्षांचा असल्याने त्याला वनडे उपकर्णधारपदातून वगळण्याचा प्रस्ताव दिला होता. लोकेश राहुलला एकदिवसीय संघाचे उप-कर्णधारपद सोपवावे अशी त्याची इच्छा होती, तर पंतने ही जबाबदारी टी-20 स्वरूपात पार पाडावी. रोहित सध्या 34 वर्षांचा आहे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये नवीन कर्णधार म्हणून त्याचा दावा सर्वात मजबूत आहे. सूत्राने सांगितले की बोर्डला ते आवडले नाही, आणि असे मानले जात आहे की कोहलीला खरा उत्तराधिकारी नको आहे. कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडल्यास रोहितला ही जबाबदारी मिळणे जवळजवळ निश्चित आहे आणि अशा स्थितीत पंत, राहुल आणि जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाचे दावेदार असू शकतात. जर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलचे विजेतेपद जिंकला तर त्याचा कर्णधार पंत आपला दावा मजबूत करू शकतो.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर तुम्ही सौरव आणि जय शाह यांचे वक्तव्य पाहिले तर दोघांनीही शुभेच्छा दिल्या आहेत पण 2023 मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तो कर्णधार म्हणून राहील की नाही यावर एक शब्दही बोलले नाही. टी 20 विश्वचषकानंतर पद सोडणाऱ्या रवी शास्त्रीने कोहलीशी सविस्तर बोलले असल्याची माहिती मिळाली आहे आणि आता तो सचिन तेंडुलकरचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्याच्या त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करेल. तसेच जर 2023 पर्यंत भारताच्या कॅलेंडरवर नजर टाकली तर वर्ल्ड कप व्यतिरिक्त 20 द्विपक्षीय टी-20 सामानाने आहेत ज्यात कोहली नेतृत्व करणार नाही.