WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी Team India च्या बायो-बबलमध्ये या ‘X-फॅक्टर’ खेळाडूची एंट्री, हॉटेल-रूम मधून शेअर केली मिरर-सेल्फी
रवींद्र जडेजा मिरर-सेल्फी (Photo Credit: Instagram)

Ravindra Jadeja Mirror Selfie: भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यासाठी इंग्लंडला (England) रवाना होण्यापूर्वी सोमवारी मुंबईत (Mumbai) आपला क्वारंटाईन कालावधी सुरू केला. जडेजाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि “प्रवास सुरु झाला” असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली. गेल्या आठवड्यात मिताली राज, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मयंक अग्रवाल आणि वॉशिंग्टन सुंदर हे चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाले होते. इंग्लंड दौऱ्यावर न्यूझीलंड विरुद्ध आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांसाठी पुरुष संघ यूकेला (UK) रवाना होईल. दुसरीकडे महिला संघ एक कसोटी, तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यात इंग्लंड विरोधात मैदानावर उतरेल. दोन्ही संघ 2 जून रोजी इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे. (IPL 2021 चा दुसरा टप्पा आयोजित करण्यासाठी BCCI ची धडपड, ECB कडे टेस्ट सिरीजच्या वेळापत्रकात बदलाची केली विनंती)

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या रवींद्र जडेजा हॉटेल-रूममधून मिरर सेल्फी शेअर करत मुंबई गाठण्याविषयी माहिती दिली. सोमवारी हॉटेलमधून त्याने लाल टी-शर्टमध्ये स्वत:चा मिरर-सेल्फी पोस्ट केला. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने 19 मे रोजी मुंबईत क्वारंटाईनसाठी टीम हॉटेलमध्ये बोलावले होते. पण मुंबई आणि जवळपासच्या खेळाडूंना यामध्ये सूट देत 24 मे पर्यंत येण्याची परवानगी दिली होती. तथापि खेळाडूंना आपल्या घरीच कठोर नियमांत क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्ध WTC फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने राष्ट्रीय संघासाठी एक फूलप्रूफ योजना तयार केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindra jadeja (@ravindra.jadeja)

यूकेला जाण्यासाठी निघालेल्या भारतीय पथकाच्या जवळपास सर्व सदस्यांनी त्यांच्या कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि ब्रिटनच्या आरोग्य विभागाकडून त्यांना कोविड-19 चा दुसरा डोस दिला जाईल. शिवाय, मुंबईत जमण्यापूर्वी सर्व खेळाडूंची घरीच तीन आरटी-पीसीआर चाचणी घेण्याची व्यवस्था देखील बोर्डाने केली होती. दरम्यान, इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय पुरुष संघ 10 दिवस क्वारंटाईन होईल तथापि, यावेळी टीम इंडियाला सराव करण्याची मुभा दिली जाईल.