अंडर-19 विश्वचषक ट्रॉफी (Photo Credit: Getty Images)

अफगाणिस्तान अंडर 19 क्रिकेट संघाच्या (Afghanistan U19 Team) वेस्ट इंडिजला (West Indies) येण्यास उशीर झाल्यामुळे आयसीसी अंडर-19 विश्वचषक (ICC U19 World Cup) 2022 च्या गट C चे वेळापत्रक बदलावे लागले आहे. आयसीसीच्या (ICC) स्पर्धेच्या तांत्रिक समितीने वेळापत्रकात बदल करण्यास मान्यता दिली आहे. या समितीमध्ये आयसीसीचे टूर्नामेंट हेड ख्रिस टेटली, आयसीसीचे वरिष्ठ इव्हेंट मॅनेजर फवाझ बक्श, टूर्नामेंट डायरेक्टर रोलँड होल्डर आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी अॅलन विल्किन्स आणि रसेल अर्नोल्ड यांचा समावेश आहे. आयसीसीने अफगाणिस्तानच्या गटातील सहा पैकी चार सामने बदले आहे. 14 जानेवारी रोजी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने अंडर-19 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी श्रीलंका आणि स्कॉटलंड यांच्यातही आमाणसामाना होणार आहे. दुसरीकडे, भारतीय संघ 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. (India U-19 World Cup 2022 Schedule: यश धुल्लच्या अंडर-19 संघाचे असे आहे संपूर्ण WC वेळापत्रक, जाणून घ्या कोणत्या संघाशी कधी भिडणार भारताचे यंगस्टर्स)

आयसीसीने एका निवेदनात म्हटले की, “प्रवासासाठी आवश्यक व्हिसा मिळाल्यानंतर अफगाणिस्तान संघ वेस्ट इंडिजला पोहोचेल आणि क्वारंटाईन कालावधी पूर्ण करेल. आम्हाला आनंद आहे की अफगाणिस्तानने आवश्यक व्हिसा मिळवला आणि ते स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्व सामने निर्धारित वेळेत व्हावेत यासाठी आम्ही क गटाचे वेळापत्रक बदलले आहे. सर्व स्पर्धक सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.” अफगाणिस्तान संघाला विश्वचषकात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचे सराव सामनेही होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता संघ सराव सामन्यांशिवाय विश्वचषकात खेळणार आहे. आयसीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार अफगाणिस्तानचा पहिला सामना आता 16 जानेवारी ऐवजी 18 जानेवारी रोजी होईल. यापूर्वी त्यांचा सलामीचा सामना झिम्बाब्वेशी होता, जो आता पापुआ न्यू गिनी विरोधात असेल. अफगाणिस्तान संघ सातव्यांदा अंडर-19 विश्वचषकात सहभागी होत आहे. 2010 मध्ये तो पहिल्यांदाच पात्र झाला होता. त्यानंतर प्रत्येक आवृत्ती खेळली गेली आहे. 2018 मध्ये उपांत्य फेरी त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

क गटातील सहा सामन्यांचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे-

15 जानेवारी: झिम्बाब्वे विरुद्ध पापुआ न्यू गिनी

17 जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे

18 जानेवारी: अफगाणिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी (अपरिवर्तित)

20 जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (अपरिवर्तित)

22 जानेवारी: पाकिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी

22 जानेवारी: अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे