India U-19 World Cup 2022 Schedule: यश धुल्लच्या अंडर-19 संघाचे असे आहे संपूर्ण WC वेळापत्रक, जाणून घ्या कोणत्या संघाशी कधी भिडणार भारताचे यंगस्टर्स
अंडर-19 विश्वचषक ट्रॉफी (Photo Credit: Getty Images)

India U-19 World Cup 2022 Schedule: अंडर-19 विश्वचषक 2022 वेस्ट इंडिजमध्ये  (West Indies) आयोजित केला जात आहे. वेस्ट इंडिज प्रथमच अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करत असून ही स्पर्धा 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. भारतीय संघ (Indian Team) हा अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने (Team India) 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपचा किताब जिंकला आहे. यानंतर, 2016 आणि 2020 मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत भारत उपविजेता ठरला होता. विंडीज देशात होणाऱ्या यंदाच्या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. यश धुलच्या नेतृत्वात भारतीय संघाला ब गटात ठेवण्यात आले आहे.

भारतासह दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा देखील या गटात आहेत. भारतीय संघ 15 जानेवारी रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्याने मोहिमेची सुरुवात करेल. अंडर-19 आशिया चषक जिंकून विश्वचषकात पोहोचलेल्या भारतीय संघाचे मनोबल उंचावले असून सराव सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजचा 108 धावांनी पराभव करून आपल्या जोरदार तयारीचा दाखला दिला आहे. अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी अँटिग्वा येथील सर विव रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. शेवटचा अंडर-19 विश्वचषक 2020 मध्ये खेळला गेला होता जिथे बांगलादेशने भारतावर रोमहर्षक विजय मिळवून जेतेपद पटकावले होते. दरम्यान, ग्रुप फेरीदरम्यान टीम इंडियाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत.

भारताचे पूर्ण अंडर-19 विश्वचषक वेळापत्रक

15 जानेवारी: भारत अंडर-19 विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे संध्याकाळी 7.30 वाजता

19 जानेवारी: भारत अंडर-19 विरुद्ध आयर्लंड अंडर-19 ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद येथे संध्याकाळी 7.30 वाजता

22 जानेवारी: भारत U19 वि युगांडा U19 ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद येथे संध्याकाळी 7.30 वाजता

भारताचा अंडर-19 वर्ल्ड कप संघ:

यश धुल्ल (कॅप्टन), हरनूर सिंह, आंगकृष्ण रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनेश्‍वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, विक्की वासु. ओस्तवाल, रविकुमार, गर्व सांगवान.

प्रवास राखीव: ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, अमृत राज उपाध्याय.