Video: अंडर-19 विश्वचषक सेमीफायनलमध्ये ऐतिहासिक विजयानंतर बांग्लादेशी टीमने असा केला उत्सव साजरा
बांग्लादेशी खेळाडूंचा डान्स (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

दक्षिण आफ्रिकामध्ये सुरु असलेल्या अंडर-19 विश्वचषकच्या (World Cup) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड (New Zealand0 आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ आमने-सामने आले. यामध्ये बांग्लादेशी खेळाडूंनी सुरुवातीपासून किवी संघावर दबाव कायम ठेवला होता. महमूदुल हसन जॉय याच्या शतकी खेळीच्या जोरावर बांग्लादेशने  न्यूझीलंडचा 6 विकेट्सने पराभव करत पपहिल्यांदा अंडर-19 विश्वचषकची अंतिम फेरी गाठली. आयसीसीच्या अंडर-19 विश्वचषकच्या जेतेपदासाठी बांग्लादेशचा अंतिम फेरीत सामना आता रविवारी (9 फेब्रुवारी) गतविजेत्या भारत संघाशी होईल. हा विजय बांग्लादेश टीमसाठी खूप मोठा आहे आणि ते सध्या आनंदात असणे साहजिक आहे. न्यूझीलंडला 6 विकेटने विजय मिळवल्यावर बांग्लादेश अंडर-19 खेळाडूंनी मैदानावर मजेदार डान्स करुन आपला विजय साजरा केला. (ICC U19 World Cup: न्यूझीलंडला पराभूत करून बांग्लादेश प्रथमच फायनलमध्ये; भारताशी असेल अंतिम सामना)

बांग्लादेशची टीम प्रथमच अंडर-19 विश्वचषक अंतिम सामन्यात पोहोचली. आणि आता त्यांचा सामना पाच वेळा अंडर-19 चॅम्पियन्स भारताशी होईल. सेमीफायनलमधील विजयानंतर बांग्लादेशी खेळाडूंनी मैदानात त्यांचे डान्स मूव्हज दाखवले आणि सहकार्य केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. बांग्लादेश खेळाडूंच्या या नृत्याचा व्हिडिओ क्रिकेट वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. पाहा व्हिडिओ:

पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये आठ गडी गमावून 211 धावा केल्या आणि बांग्लादेशने हे लक्ष्य 44.1 ओव्हरमध्ये चार गडी गमावून गाठले. बेकहॅम व्हीलर ग्रीनलने किवींकडून सर्वाधिक धावा केल्या. दुसरीकडे, सामन्यात बांग्लादेशने सलामी जोडी गमावल्यावर गमावल्यानंतर महमूदुल हसन जॉयने शतक झळकावले. तौहिद हृदॉय आणि शहादत हुसेन या दोघांनी प्रत्येकी 40 धावा केल्या आणि सामना 44.1 षटकांत संपुष्टात आला. यापूर्वी, पहिल्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताने 10 विकेटने विजय मिळवत फायनल फेरी गाठली होती. यशस्वी जयस्वाल आणि दिव्यंश सक्सेना यांच्या फलंदाजीतील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. आता अंतिम सामना 9 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता होईल.