भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने 31 व्या वाढदिवशी विनोदी पद्धतीने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli0 याला शुभेच्छा दिल्या. क्रिकेटर्सपासून चाहत्यांपर्यंत सोशल मीडियावर यूजर्सने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सोशल मीडियावर कोहलीला शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांची लाईन लागली, पण पंतच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतने कोहलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा प्रकारे दिल्या की सोशल मीडियावर त्या लगेच व्हायरल झाल्या. काहींनी पंतने केलेल्या ट्विटवर जास्त लक्ष दिले नाही, तर काहींनी पंतला त्याच्या मजेदार विशेससाठी ट्रोल केले. टीम इंडियाचा कर्णधार आणि सध्या क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून कामगिरी करणारा कोहली मंगळवारी 31 व्या वर्षाचा झाला. कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह भूतानमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. (Happy Birthday Virat Kohli: 31 व्या वाढदिवसानिमित्त विराट कोहली याने लिहिली Life Lesson देणारी 'ही' खास पोस्ट, पाहा Tweet)
विराटला वाढदिवसाच्याशुभेच्छा देत, पंतने मस्करीत लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा चाचा. नेहमी हसत राहा." याच्यानंतर सोशल मीडियावर पंतच्या ट्रोलर्सने त्याच्या या ट्विटला विराटशी जवळीक साधण्यासाठी केल्याच्या उद्देशाने घेतले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतने ट्विटरवर कोहलीसाठी 'चाचा' शब्दाचा वापर केला. पंतने सोशल मीडियावर विराटसह एक फोटो शेअर केला.
Happy birthday chachaaa😬😬 @imVkohli always keep smiling 🎂 pic.twitter.com/i4s69d2ixS
— Rishabh Pant (@RishabhPant17) November 5, 2019
पहा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या प्रतिक्रिया:
आता काका पुतण्याला संघातून बाहेर काढणार नाही
Ab chacha team se nhi nikalenge bhateje ko😜
— Pradeep Kumar (@tigerpradeeep) November 5, 2019
सर्वात जबरदस्त वाढदिवसाच्या शुभेच्छा
Sabse jabardast bday wish 😆
— Kumar Vivek (@vivekhindu_up) November 5, 2019
हे सर्व सोड... धावा करण्यावर लक्ष दे
ye sab chhodo... run kaise bane uspe dhyaan de
— 🕷️ (@spidernoir99) November 5, 2019
मस्का मारून किती काळ संघात राहशील, आपल्या खेळाकडे देखील लक्ष दे
मस्का मारकर कब तक टीम में रहोगे कुछ अपने खेल पर भी ध्यान दो ।।
— Ravi Tiwari (@itsRaviTiwari) November 5, 2019
तयार राहा पुतण्या विराटच्या तोंडून स्तुती ऐकण्यासाठी
Ready rahhooo bhateje virat ke muh se tariff sun ne ke liye 😅
— Pradeep Kumar (@tigerpradeeep) November 5, 2019
पंत मागील काही काळापासून त्याच्या खराब खेळीमुळे टीकेचा पात्र बनला आहे. सतत फ्लॉप झाल्यानंतर सोशल मीडियावरही त्याला बर्यापैकी ट्रोल केले जात आहे. बांग्लादेशविरुद्ध पंतने खास प्रभावी कामगिरी केली नाही. संघाची स्थिती खराब असताना पंत फलंदाजीसाठी आला, पण तो वेगाने धावा करू शकला नाही. शिवाय, विकेटकीपिंग करतानाही पंत प्रभाव पडण्यास अपयशी राहिला.