अंबाती रायुडू याच्या निवृत्तीवर चाहत्यांनी साधला निशाणा, 3D यू-टर्नवर ट्रोल करत उडवली खिल्ली
अंबाती रायडू File Image (Photo Credits: IANS)  

विश्वचषक 2019 साठी भारतीय संघाने दुर्लक्ष केल्यानंतर अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने काही महिन्यांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रारूपातून निवृत्तीची घोषणा केली होती. पण, आता रायडूने निवृत्तीचा पुनर्विचार केला आहे आणि क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. याची पुष्टी त्याच्या राज्य क्रिकेट संघटनेने दिली आहे. त्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला एक ई-मेल लिहिला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, निवृत्तीचा निर्णय त्याने भावनिक होऊन घेतला आणि आता त्याला पुन्हा क्रिकेट खेळायचे आहे. रायडूच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा होत होती. निवृत्तीची घोषणा झाल्यापासून भारतीय निवड समितीवरही टीका केली जात होती. दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार रायडूने हैदराबाद क्रिकेट असोसिएशन समितीचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांना एक ई-मेल पाठविला आहे. यात त्याने निवृत्त होण्याच्या निर्णयामागे आपला दोष असल्याचे स्पष्टपणे मानले आहे. (अंबाती रायडू याचे निवृत्तीमधून पुनरागमन, आता चेन्नई सुपर किंग्स नंतर 'या' संघाकडून खेळणार)

रायडूने तब्बल दोन महिन्याआधी निवृत्ती जाहीर केली होती. आणि आता या निर्णयातून यु-टर्न घेतल्यानंतर चाहत्यांकडून मात्र त्याला 3D पद्धतीने ट्रोल केले जात आहे.

3 डी यू-टर्न

हा काय शाहिद आफ्रिदी बनण्याच्या मार्गावर आहे

येतो, जातो, आणि मग परत येतो

विश्वचषकदरम्यान रायडू चर्चेत राहिला होता. रायुडूने 3 जुलै रोजी निवृत्तीची घोषणा केली. आयसीसी विश्वचषक दरम्यान अचानक त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. विश्वचषकमध्ये शिखर धवन याला दुखापत झाल्यावर अष्टपैलू विजय शंकर याची निवड करण्यात आली होती. पण, नंतर शंकरला दुखापत झाल्यावर रायडूला दुर्लक्ष करत मयंक अग्रवाल याला इंग्लंडला पाठवण्यात आले होते. त्यामुळे रायडू निवड समितीवर नाराज असल्याने निवृत्ती जाहीर केली. मागील वर्षी रायडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रायडूने 2013 साली वनडे क्रिकेटमधून पदार्पण करत शेवटचा सामना गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. दुसरीकडे, रायडू चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून आयपीएल खेळतो.