अंबाती रायडू (Photo Credit: AP/PTI)

विश्वचषक संघात न निवडल्यामुळे संतप्त झाल्यानंतर निवृत्त झालेल्या अंबाती रायडू याने आपले मत बदलले आहे. विश्वचषकदरम्यान रायडू चर्चेत राहिला होता. रायुडूने 3 जुलै रोजी निवृत्तीची घोषणा केली. आयसीसी विश्वचषक दरम्यान अचानक त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. या भावनिक निर्णयाला दोन महिनेही झाले नाहीत आणि आता त्याने निवृत्ती मागे घेत पुन्हा क्रिकेट खेळायचे म्हटले आहेत. 33 वर्षीय रायुडूने यासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला याबाबत पत्र लिहिले आहे. रायुडूने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या आपल्या निर्णयाला भावनांनी उचललेले पाऊल म्हणून वर्णन केले आहे. द हिंदूच्या अहवालानुसार, त्याने असेही म्हटले की मला खेळाच्या सर्व स्वरूपात खेळायचे आहे. (निवृत्तीवर अंबाती रायडू याचे यू-टर्न; टिम इंडिया, IPL मध्ये खेळण्याचे दिले संकेत)

अहवालानुसार अंबाती रायुडू म्हणाले की, "कठीण काळात मला साथ दिल्याबद्दल चेन्नई सुपरकिंग्ज, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नोएल डेव्हिड यांचे आभार मानायचे आहेत. या लोकांनी मला जाणवून दिले की माझ्याकडे अजूनही बरेच क्रिकेट बाकी आहे. मी या मोसमात प्रतिभावान हैदराबाद संघाबरोबर आहे आणि माझ्या सर्व क्षमतांनी संघाला मदत करू इच्छित आहे. मी 10 सप्टेंबरपासून हैदराबाद संघात सामील होण्यास उपलब्ध आहे." अंबाती रायुडूने 55 वनडे आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने वनडे सामन्यात तीन शतक आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने 1694 धावा केल्या आहेत.

यानंतर एचसीएच्या सीओएने एक मेल पाठवत सांगितले की, "हे आपल्याला सांगण्यासाठी आहे की रायडूने आपली निवृत्तीची घोषणा मागे घेतली आहे आणि 2019-20 साठी एचसीएच्या खेळाच्या छोट्या स्वरूपात स्वत:ला उपलब्ध करून दिले आहे.”