विश्वचषक स्पर्धेसाठी सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे भारताच्या अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण आता रायडूने निवृत्तीवर युटर्न घेत भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. 'स्पोर्ट्सस्टार'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रायडूने म्हटले की, "मला भारताबरोबर आयपीएलमध्येही खेळायचे आहे." सध्या रायडू तामिळनाडू येथे एक स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान रायडूची मुलाखत घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रायडू महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) कडून आयपीएलमध्ये खेळत आहे आणि आगामी हंगामातही त्याच फ्रँचायझीसाठी खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. (टेस्टनंतर आता रविचंद्रन अश्विन याचे Kings XI Punjab संघाचे कर्णधारपदही धोक्यात?, वाचा सविस्तर)
रायडू म्हणाला, “मी चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नक्कीच पुनरागमन करेन. माझा फिटनेस उच्च स्तरावर नेण्याची माझी प्राधान्यता आहे." दम्यान, सध्या तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या वनडे लीगमध्ये खेळत असलेल्या रायडूने सांगितले की, भारतीय निवडकर्त्यांचा राग आल्याने किंवा आपणास विश्वचषकात स्थान न मिळाल्याने निराश झाल्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला नव्हता. रायुडू म्हणाला, "मी असे म्हणणार नाही की हा भावनिक निर्णय होता कारण मी गेल्या चार वर्षांत वर्ल्ड कपसाठी कठोर परिश्रम केले होते. आपल्याला निराश होण्याचा हक्क आहे आणि मला वाटले की मला निवृत्तीची वेळ आली आहे."
विश्वचषकमध्ये शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाल्यावर रायडूला वगळता बीसीसीआयने रिषभ पंत आणि मयंक अग्रवाल यांना यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे रायुडू नाराज होता. 33 वर्षीय रायुडूने 55 वनडे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. आणि त्यामुळेच विश्वचषकसाठी टीम इंडियामध्ये त्याची निवड केली गेली नसावी असे म्हटले जात आहे.