मुलीला आरती करताना पाहून शाहिद आफ्रिदी याने तोडला होता टीव्ही, जुन्या व्हायरल व्हिडिओवर यूजर्सने लगावली फटकार
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Twitter/osmanuzair_pak_crik)

पाकिस्तान क्रिकेट आजकाल चर्चेत बनला आहे. शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने दानिश कनेरिया (Danish Kaneria) याच्यावर केलेल्या निवेदनानंतर पाकिस्तानात हिंदू क्रिकेटपटूंचा छळ केल्याच्या बातम्या समोर येत आहे. या सर्वांमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आफ्रिदी भारतीय रीती आणि उपासना पद्धतीची खिल्ली उडवताना दिसत आहे. पाकिस्तानी टीव्ही वाहिनीच्या व्हिडिओतील एका मुलाखतीच्या वेळी आफ्रिदीने हिंदूंनी आरती करण्याच्या पद्धतीची थट्टा केली. व्हिडिओ थोडा जुना आहे, परंतु सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आफ्रिदीने म्हटले आहे की त्याने एकदा आपल्या घराचा टीव्ही तोडला होता पण बेगममुळे असे केले. आफ्रिदीने पुढे नमूद करत म्हणाला की पूर्वी आमच्या टीव्ही चॅनेलवर ड्रामा चालायचे. मी बेगमला नाकारत असे की तुम्ही स्वतः टीव्ही पाहता टिक आहे, पण मुलांना दाखवू नका. त्यानंतर, मी माझ्या एका मुलाला स्टार प्लस शो पाहत ‘आरती’ करतांना पाहिले. त्यानंतर मी टीव्हीच फोडला.”

आफ्रिदीवर या वक्तव्यासाठी सोशल मीडियावर टीका केली जात आहे. या व्हिडिओवर यूजर्सने बरीच टीका केली आणि हिंदू परंपरेची खिल्ली उडवल्याबद्दल बर्‍याच जणांनी अष्टपैलू खेळाडूंला फटकारले आहे. पाहा व्हिडिओ: 

पाहा आफ्रिदीच्या वक्तव्यावर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

शाहिद आफ्रिदी लाज वाटू दे

पाकिस्तानमध्ये हिंदू कसे टिकून आहेत याबद्दल मला आश्चर्य वाटते

आफ्रिदी एक जिहादी असल्याचे दिसते

किती खालच्या स्तराचे आहे याचे आयुष्य

आफ्रिदीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर अश्या वेळी व्हायरल झाला आहे, ज्यावेळी दानिश कनेरियाने (Danish Kaneria) संघातील खेळाडूंवर भेदभाव करण्याचा आरोप केला आहे. कनेरिया आधी अख्तरने आरोप केला होता. अख्तर म्हणाला होता की संघातील खेळाडू त्याच्याबरोबर खायलाही तयार नव्हते कारण की तो हिंदू होता. अख्तरने नंतर त्याच्या विधानाला चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे म्हटले. शिवाय, इंझमाम-उल-हक आणि वकार युनूस यांच्यासारख्या पाकिस्तानच्या इतर प्रसिद्ध क्रिकेटपटूंनीही दानिश कनेरियाचा दावा फेटाळून लावला.