MS Dhoni च्या लष्करात भर्ती होण्याच्या निर्णयाची David Lloyd यांनी उडवली चेष्टा, धोनी आर्मी ने सोशल मीडियावर घेतली क्लास
Mahendra Singh Dhoni (Photo Credits: PTI)

एम एस के प्रसाद (MSK Prasad) च्या नेतृत्वाखालील निवड समितीने रविवारी, 21 जुलैला वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा केली. आगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) या दौऱ्यासाठी संघाचा भाग नाही हेही सर्वांना कळून सुटले. अपेक्षेनुसार, धोनीने क्रिकेट मधून 2 महिन्याची विश्रांती घेत आपला वेळ इंडियन आर्मी सोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ 3 ऑगस्ट पासून विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज संघ 3 टी-२०, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामने खेळणार आहे. (एम एस धोनी घेणार पॅराशूट रेजिमेंट सोबत ट्रेनिंग, आर्मी प्रमुख बिपीन रावत यांनी दाखवला हिरवा कंदील, जाणून घ्या सविस्तर)

धोनीला येत्या काही काळात धोनी जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) मध्ये सैन्यासोबत प्रशिक्षण घेणार आहे. धोनीने भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट (Indian Army Parachute Regiment) सोबत प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि त्याच्या या इच्छेला मान देत सैन्य प्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, डेव्हिड लॉईड (David Lloyd) यांना हे सर्व हास्यास्पद वाटले आहे. माजी इंग्लंड (England) क्रिकेटपटू लॉईडनी धोनीच्या लष्करात सामील होण्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिले आहे. लॉईड यांनी सोशल मीडियावर धोनीची याबाबत एक स्टोरी शेअर करत त्याच्यावर हास्यास्पद टिप्पणी केली. पण धोनी आर्मीला लॉईड यांची टिप्पणी काही पसंद पडली नाही आणि धोनीच्या निर्णयाचा अपन्मान करण्यासाठी लॉईडला चांगलाच धडा शिकवला आहे. चाहत्यांनी त्यांना 'भ्याड' आणि 'मूर्ख' असे संबोधले आहे.

दरम्यान, 2011 साली धोनीला सैन्याचा लेफ्टनंट कर्नल पद देऊन गौरवण्यात आले होते. तो सैन्याच्या 106 इन्फंट्री बटालियनचा भाग देखील होता. तर मागील वर्षी पद्मा भूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्याने आपला आर्मीचा गणवेश परिधान केला होता.