Tushar Deshpande Quick Facts: राजस्थान रॉयल विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तुषार देशपांडे याच्याबद्दल घ्या जाणून
Tushar Deshpande (Photo Credits: Twitter)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 30व्या सामन्यात राजस्थान रॉयल विरुद्ध टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals Vs Rajasthan Royals) संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळला सुरु आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघात काही बदल करण्यात आले आहेत. राजस्थान विरुद्ध सामन्यात हर्षल पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला (Tushar Deshpande) संधी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे राजस्थानच्या संघात कोणतीही बदल करण्यात आले नाही. या सामन्यात राजस्थान रॉयल्स 9 ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटलच्याकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तसेच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ओपनिंग केली होती. मात्र, त्यावेळी तो स्वस्तात माघारी परतला होता. परंतु, आजच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळणार, अशी अपेक्षा केली जात आहे. या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तुषार देशपांडेने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 20 सामने खेळले असून त्याने 28.7 च्या सरासरीने 50 विकेट्स घेतले आहेत. तसेच लिस्ट एच्या 19 सामन्यात त्याने 37.4 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतले आहेत. तर, 20 टी-20 सामन्यात 17.4 च्या सरासरीने त्याने 31 विकेट्स घेतले आहेत. हे देखील वाचा-HOME OF DHONI FAN: महेंद्र सिंह धोनी याचा चाहता गोपी कृष्णन याचे कृत्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या; सीएसकेच्या पिवळ्या रंगात घर रंगवण्यासाठी केला दीड लाख रुपयांचा खर्च

 कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे.