Cricket Coincident: क्रिकेट इतिहासातील असे 5 विचित्र योगायोग ज्यांच्यावर विश्वास बसणे आहे अशक्य
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Cricket Coincident: आपल्या सामान्य जीवनशैलीमध्ये, विविध प्रकारचे योगायोग घटू शकतात; काही खरोखर आनंदी असतात, तर काही जण आपल्याला निराश करतात; तसेच काही खरोखरच धक्कादायक असू शकतात. क्रिकेटच्या (Cricket) खेळामध्ये अशा अनेक घटनांची यादी आहे ज्या आपल्याला विचलित करतात; काही अटीतटीचे सामने किंवा वेडा रेकॉर्ड प्रेक्षकांना त्यांच्या जागी बसवून ठेवतात. पण क्रिकेटच्या मैदानावर आजवर असे अनेक योगायोग घडले आहे जे प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित असणे गरजेचे आहे. क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक योगायोग घडले आहेत, जे अगदी मजेदार आहेत. (Cricket History: क्रिकेट इतिहासातील हे जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं आहे कठीण)

1. भारतीय कर्णधार आणि त्यांच्या जादुई 183 धावा

183 ही केवळ भारतीय चाहत्यांसाठी एक खास संख्या नाही तर यशस्वी भारतीय कर्णधार होण्याची जादुई संख्या आहे. कारकीर्दीतील सर्वोत्तम म्हणून कर्णधारा ला एकदा तरी 183 धावा करावी लागते. पहिले सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) 1999 च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध 159चेंडूंत 183 धावा केल्या. त्यांनतर एमएस धोनीने (MS Dhoni) त्याच श्रीलंकन संघाविरुद्ध नाबाद 183 वनडे धावा केल्या व नंतर 2007 टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) 183 धावा ठोकल्या.

2. रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) आणि सर्वात मोठे स्टेजवर भारताचे अपयश

केटलबरो नामांकित पंचांपैकी एक आहेत परंतु भारतीय संघाच्या खेळावेळी त्यांनी कामगिरी करणे भारतीय चाहत्यांना खरोखर आवडत नाही आणि यासाठी बरीच कारणे आहेत. 2014 पासून भारताने श्रीलंकेविरुद्ध 2014 वर्ल्ड टी-20 फायनल, 2015 ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल, कॅरेबियन विरूद्ध 2016 टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनल, पाकिस्तानविरुद्ध 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामना असो किंवा न्यूझीलंडविरुद्ध 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागलास असून योगायोगाने सर्व खेळांमध्ये केटलबरो फिल्ड अंपायरची भूमिका बजावत होते.

3. डेव्हन कॉनवे (Devon Conway) आणि सौरव गांगुली

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला कीवी डावखुरा डेव्हन कॉनवेने लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात शतक झळकावताना क्रिकेट जगाच्या अलीकड काळात विचित्र घटना घडली. आता हे नशीबच म्हणायचं की सौरव गांगुलीने देखील याच मैदानावर पहिले पदार्पणाच्या सामन्यात कसोटी शतक झळकावले होते. इतकंच नाही तर दोंघांचा जन्म देखील 8 जुलै रोजी झाला असून दोघांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड विरुद्ध अनुक्रमे आंतरराष्ट्रीय पदार्पण वनडे व कसोटी पदार्पण केले होते. दोघे डावखुरे फलंदाज आहेत आणि गांगुलीची वनडे डेब्यू कॅप 84 नंबर आहे तर कॉनवेला त्याच्या टी-20 कॅपवर समान क्रमांक मिळाला आहे.

4. 18 जून: भारतीय क्रिकेटमधील एक शापित दिवस

भारतीय क्रिकेटवरील शापित तारखांपैय एक 18 जून आहे. मजेदार गोष्ट म्हणजे, 2015 मध्ये बांग्लादेशविरुद्ध भारत वनडे, 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आणि पुढच्याच वर्षी कमान प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध चँपियन्स ट्रॉफीचा पराभव पत्करावा लागला; सर्व एकाच तारखेला: 18 जून.

5. कोहली धावबाद झाला आणि रोहितने द्विशतक झळकावले

हा एक अतिशय मजेदार योगायोग आहे. रोहितने वनडेमध्ये पहिले द्विशतक झळकावले तेव्हा कोहली धावबाद झाला होता. आणि रोहितने जेव्हा दुसरे दुहेरी शतक झळकावले तेव्हा देखील कोहली धावबाद झाला होता.म्हणजे जेव्हा कोहली धावबाद होते रोहित दुहेरी शतक करतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.