DC-W vs RCB-W 17th Match: महिला प्रीमियर लीगमधील लीग टप्प्यातील सामन्यांची फेरी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मोसमातील 17 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने या हंगामात 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 जिंकले आहेत. दुसरीकडे, आरसीबी संघाने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत तर 3 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात दिल्ली आणि आरसीबी यांच्यात तीन सामने झाले आहेत, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने सर्व सामने जिंकले आहेत आणि त्यामुळे या सामन्यातही त्यांचाच वरचष्मा आहे.
कुठे पाहणार लाइव्ह?
WPL चा 17 वा सामना 17 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. महिला प्रीमियर लीगचा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर होईल. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रवाह Jio Cinema ॲपवर विनामूल्य दाखवले जाईल. अशा परिस्थितीत चाहते या सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात. (हे देखील वाचा: Rishabh Pant Health Update: ऋषभ पंत आयपीएल खेळण्याबाबत शंका, एनसीएकडून अद्याप मंजुरी नाही!)
खेळपट्टीचा अहवाल
या मोसमात आतापर्यंत दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पाच सामने खेळले गेले आहेत. चार सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. एका सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला. या मैदानावरील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव केला होता. लहान चौकारांमुळे येथे मोठे फटके खेळणे फलंदाजांना सोपे जाते. आतापर्यंत या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व होते. अशा परिस्थितीत नाणेफेकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
दोन्ही संघांचे खेळाडू
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), तीतास साधू, मारिझान कॅप, लॉरा हॅरिस, मिन्नू मणी , पूनम यादव, अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल, स्नेहा दीप्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: सबिनेनी मेघना, स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मॉलिनक्स, सिमरन बहादूर, एकता बिश्त, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, केट डी क्रॉस, नादीन , श्रेयंका पाटील, दिशा कसाट, शुभा सतीश, श्रद्धा पोखरकर, इंद्राणी रॉय.