Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखुन पराभव केला आहे. तसेच त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीटही मिळालं आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताकडून हिसकावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. या मालिकेत टीम इंडियाचे पाच खेळाडू होते ज्यांची कामगिरी अत्यंत खराब होती. या खेळाडूंकडून संघाला ज्या वेळी चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, त्या वेळी या खेळाडूंनी निराशा केली.
The fastest run-chase of a 150+ target for Australia in Tests🔥
The winning runs came off Beau Webster's bat, as the team cantered to a win in just 27 overs 🤯 https://t.co/62ZjPEw7RL #AUSvIND pic.twitter.com/HWkJdK3GVJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 5, 2025
1. विराट कोहली (Virat Kohli)
टीम इंडियाचा सर्वात सीनियर खेळाडू विराट कोहली हा भारतीय फलंदाजीचा महत्त्वाचा दुवा मानला जातो, पण या मालिकेत कोहलीने निराशा केली. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीने शतक झळकावले होते, मात्र त्यानंतर प्रत्येक वेळी तीच चूक करत कोहली बाद झाला. माजी दिग्गजांनीही कोहलीच्या या खराब कामगिरीचा निषेध केला होता, पण कोहलीने आपल्या चुकीपासून काहीच शिकला नाही. कोहलीने सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 6 धावा केल्या.
2. रोहित शर्मा (Rohit Sharma)
कर्णधार रोहित शर्मासाठी हा दौरा खूपच वाईट ठरला आहे. त्यामुळे त्याला सिडनी कसोटीपासून दूर राहावे लागले. रोहित पहिला सामना खेळू शकला नाही, पण दुसऱ्या सामन्यात तो परतला. रोहित संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरला. या मालिकेत त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकावलेले नाही.
3. शुभमन गिल (Shubman Gill)
टीम इंडियाचा युवा फलंदाज गिल या मालिकेत तीन सामने खेळला, पण एकाही सामन्यात त्याच्या बॅटने चांगली खेळी केली नाही. या मालिकेत गिलने एकही अर्धशतक झळकावले नाही. सिडनी कसोटीत रोहितच्या जागी गिलला खेळण्याची संधी मिळाली, पण सामन्याच्या पहिल्या डावात गिलने केवळ 20 धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 13 धावा केल्या.
4. केएल राहुल (KL Rahul)
केएल राहुलने पर्थ कसोटीत चांगली कामगिरी केली होती, त्यानंतर पुढच्या सामन्यातही राहुल ओपनिंग करताना दिसला. मालिकेतील उर्वरित चार सामन्यांमध्ये राहुलने बरीच निराशा केली. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात राहुलने केवळ 4 धावा केल्या तर दुसऱ्या डावात केएलने 13 धावा केल्या.
5. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)
या मालिकेत मोहम्मद सिराजची कामगिरी काही खास नव्हती. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त या मालिकेत अन्य कोणताही वेगवान गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. सिराजने सिडनी कसोटीत नक्कीच चांगली गोलंदाजी केली पण संपूर्ण मालिकेतील त्याची कामगिरी पाहिली तर त्यात काही विशेष नव्हते. सिराजने सिडनी कसोटीत 4 बळी घेतले होते.