भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

आज भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका (India Vs South Africa) यांच्यात आज बंगळरू (Bangalore) येथील चिन्नस्वामी मैदानात (M Chinnaswamy Stadium) टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत 0-1 अशी अघाडी घेतली आहे. धर्मशाला येथे भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजाच्या उत्कृष्ट प्रदर्शन आणि कोहलीचा चांगला खेळ यामुळे भारतीय संघाने 7 विकेट्स राखून विजय मिळवला होता. 3 सामन्याच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाकडे तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

आज बंगळरू येथील चिन्नस्वामी मैदानात हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तसेच दुसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने महत्वाची भुमिका पार पाडली होती. कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावरच भारतीय संघाने या सामन्यात 7 विकेट्स राखून विजय मिळवला होता. यावेळी विराटने अवघ्या 52 चेंडूत 72 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. यात 4 चौकार आणि 2 षटकारचा समावेश आहे. सर्वप्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफ्रिकेच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून केवळ 149 धांवा केल्या होत्या. या सामन्यात 150 धावांचे लक्ष्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 19 व्या ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण केले होते. हे देखील वाचा-हॅमिल्टन मसकद्जा याने रचला इतिहास; अंतराराष्ट्रीय टी-20 क्रिकेट करिअरमधील अखेरच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला

सध्या भारतीय संघ सर्वोकृष्ट कामगिरी करत असला तरी, भारतीय संघाचा विकेटकिपर आणि फलंदाज रिषभ पंतने चाहत्यांना निराश केले आहे. आजच्या सामन्यात रिषभ पंत यांने चांगली कामगिरी करुन दाखवावी, अशी अनेकांकडून अपेक्षा केली जात आहे.

संघ:

भारतः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कर्णधार, यष्टीरक्षक), रासी व्हॅन डर ड्यूसेन, टेंबा बावुमा, जूनियर डाला, बार्जर्न फोर्टुईन, ब्यूरन हेंड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एरिक नृजे, अ‍ॅन्डिले फेलुक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, तब्रेझीझ, टब्रेझ जॉन स्मट्स.