
आशिया चषकाची (Asia Cup 2023) पहिली सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी पाकिस्तान आणि नेपाळ (PAK vs NEP) यांच्यात झाला. आशिया चषक स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. यावेळी आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना उद्या म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. टीम इंडियाने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. टीम इंडियाने शेवटच्या वेळी हे विजेतेपद 2018 मध्ये जिंकले होते आणि त्यावेळी देखील ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतात तेव्हा जल्लोष शिगेला पोहोचतो. यावेळी आशिया चषकात उद्या म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. (हे देखील वाचा: IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात केएल राहुल जखमी, संजू सॅमसन की इशान किशन कोणाल मिळणार संधी?)
आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने शानदार सुरुवात करत नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय मिळवला. नेपाळविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या बॅटला आग लागली. मात्र, चाहते टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. क्रिकेटमध्ये जेव्हा-जेव्हा दोन देशांमधला सामना होतो, तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते.
पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळतील 'हे' युवा खेळाडू
टीम इंडियाचे असे अनेक खेळाडू आहेत, जे पाकिस्तानविरुद्ध वनडे खेळण्यासाठी पहिल्यांदाच मैदानात उतरतील. यात युवा सलामीवीर शुभमन गिल, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. हे सर्व दिग्गज खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये राहतील, असे मानले जात आहे. मात्र, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास तेही पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळतील.
भारत आणि पाकिस्तान चार वर्षांनंतर एकमेकांशी भिडणार
यावेळी आशिया कपमध्ये उद्या म्हणजेच 2 सप्टेंबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. चार वर्षांनंतर दोन्ही संघ वनडेत भिडणार आहेत. याआधी 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात दोघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. यावेळी आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन वेळा सामना होऊ शकतो. दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर हे पाहायला मिळेल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.