Rohit Sharma ODI Captaincy: रोहित शर्माच्या हाती वनडे संघाची कमान, आता ‘हे’ 3 स्टार बनू शकतात टीम इंडियाचे पुढील उपकर्णधार
रोहित शर्मा आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती संघाच्या टी-20 सह एकदिवसीय संघाची कमान देण्याची औपचारिक घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली. भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेनंतर कोहलीने नेतृत्वाच्या भूमिकेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितची पूर्णवेळ आंतरराष्ट्रीय टी-20 कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे विराट कोहली केवळ कसोटीतच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (South Africa Tour) रोहितला कसोटी संघाचा उपकर्णधार पदही सोपवण्यात आले आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्मा वनडे कर्णधार बनल्याने या फॉरमॅटमधील उपकर्णधार पद रिक्त झाले आहे. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी अद्याप भारताचा संघ जाहीर झालेला नाही आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचा Deputy कोण याबद्दल चर्चा रंगली असून या पदासाठी संघाचे तीन खेळाडू मुख्य दावेदार असू शकतात. (Virat Kohli vs Rohit Sharma: टीम इंडियात सत्ता बदल, जाणून घ्या काय म्हणतात रोहित शर्मा - विराट कोहली ODI कॅप्टन्सी आकडे; कोण आहे कोणावर भारी)

केएल राहुल (KL Rahul)

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर राहुल वनडेमध्ये उपकर्णधार पदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. राहुल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा मुख्य सदस्य आहे. यापरी राहुलची ती-20 कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच तो व्हाईट-बॉल तज्ञ खेळाडू आहे आणि भविष्यात टीम इंडियासाठी कर्णधारपदाचा पर्याय बनू शकतो.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

टीम इंडियाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयपीएल 2018 मध्ये गौतम गंभीरच्या जागी अय्यरची दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वात दिल्लीने गेल्या आयपीएल 2020 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली. श्रेयस हळूहळू तिन्ही फॉरमॅटमध्ये आपले स्थान पक्के करत आहे. अशा परिस्थितीत तो वनडे उपकर्णधार पदाच्या शर्यतीत उभा राहू शकतो.

रिषभ पंत (Rishabh Pant)

पंत देखील टीम इंडियाचा पुढील वनडे उपकर्णधार बनू शकतो. पंतने गेल्या काही महिन्यांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना पंतने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी केली आणि उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला. पंतची ही कामगिरी पाहून बीसीसीआय त्याला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्याचा नक्कीच विचार करू शकते.