Rohit Sharma vs Virat Kohli: युएई आणि ओमान येथे झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या टी-20 कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर करताच त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदाच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. तथापि बुधवारी बीसीसीआय (BCCI) निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (South Africa Tour) भारतीय संघाची (Indian Team) घोषणा केली तेव्हा त्यात दोन धक्कादायक मोठे निर्णय घेण्यात आले. विराट कोहली यापुढे भारतीय वनडे संघाचा कर्णधार असणार नाही अशी घोषणा करण्यात आली. त्याच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाची कमान सांभाळेल, म्हणजेच आता ‘हिटमॅन’कडे टी-20 आणि वनडे संघाची जबाबदारी असेल तर विराट फक्त कसोटीत कर्णधार असेल. अशा स्थितीत रोहित आणि विराटच्या कर्णधारपदाची आकडेवारीवर एक नजर टाकूया. (Virat Kohli ODI Captaincy: विराट कोहलीने वनडे कर्णधारपद सोडण्यास दिला नकार, BCCI ने दिला होता 48 तासांचा अवधी)
रोहित शर्मा VS विराट कोहली
टीम इंडियाच्या एकदिवसीय कर्णधार पदाबद्दल बोलायचे तर त्यात विराट कोहली आणि रोहित शर्माचे आकडे काय सांगतात हे अनेकांना जाणून घ्यायला आवडेल. अर्थात विराटने बराच काळ वनडे संघाचे नेतृत्व केले आहे, त्यामुळे त्याच्याकडे रोहितपेक्षा अधिक अनुभव असेल, पण काही सामन्यांमध्ये रोहितला कर्णधारपदाची संधीही मिळाली. आणि यादरम्यानचे आकडे काय सांगतात ते जाणून घेऊया. एकदिवसीय कर्णधार म्हणून कोहलीच्या विक्रमावर शंका नाही पण गेल्या 4 वर्षात आयसीसीचे मोठे जेतेपद जिंकण्यात भारताची असमर्थता चिंतेचे कारण आहे. विराटने 95 वनडे सामन्यात नेतृत्व केले असून संघाने 65 सामने जिंकले आहेत. तर 27 सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहायला लागले आहे. यादरम्यान त्याची विजयी सरासरी 68.42 टक्के राहिली आहे. विराट कोहलीने या कालावधीत 5449 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून त्याने 21 शतके आणि 27 अर्धशतके झळकावले आहेत.
Was it the right call to replace Virat Kohli as India ODI captain? pic.twitter.com/Glp5DqeSIt
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 9, 2021
दुसरीकडे, एकदिवसीय कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. रोहितने आतापर्यंत 10 वनडे आंतरराष्ट्रीय संघाची कमान सांभाळली आहे. यापैकी टीम इंडियाने 8 जिंकले तर त्यांना दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. 2018 साली श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत त्याने पहिल्यांदा नेतृत्व केले होते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार असताना त्याने 10 सामन्यांमध्ये एक द्विशतक, एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. बीसीसीआयने बरीच चर्चा आणि वाढत्या मागणीनंतर भारतीय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नवीन युग सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नवा कर्णधार रोहित शर्मा आता भारतीय संघाला 2022 टी-20 आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयार करतील. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बोर्डाने इतका मोठा निर्णय घेतला आहे.