Team India(Photo Credit - Twitter)

आता टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) च्या सुपर-12 सामने सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. दुसऱ्या फेरीची सुरुवात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील 22 ऑक्टोबर रोजी होणार्‍या पहिल्या सामन्याने होईल, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील आयसीसी स्पर्धा खेळणारी टीम इंडिया 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) मोहिमेला सुरुवात करेल. भारत-पाकिस्तानसह जगभरातील चाहत्यांच्या नजरा या महान सामन्यावर खिळल्या आहेत. भारताचे फलंदाज चांगल्या फार्ममध्ये आहे आणि जवळपास खेळाडूही निश्चित झाले आहे, गोलंदाजीसमोर अनेक प्रश्न समोर उभे आहे पण हे तीन भारतीय गोलंदाज टी-20 विश्वचषकाचा संपूर्ण खेळ बदलु शकतात. कोण आह ते घ्या जाणून...

1. मोहम्मद शमी

दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. निवडकर्त्यांनी शमीला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघात स्थान दिले आहे. तसेच, शमीला ऑस्ट्रलियात खेळण्याचा अनुभव आहे. चिताच्या गतीने तो कोणत्याही फलंदाजाला अडचणीत आणू शकतो. शमी कोणत्याही धडाकेबाज फलंदाजाला त्याच्या 'स्विंग नेट'मध्ये अडकवू शकतो. खेळ बदलण्याची ताकद त्याच्यात आहे. याचे प्रत्यंतर सराव सामन्यात पाहायला मिळाले, जेव्हा त्याने एकाच षटकात कांगारूंकडून विजय हिसकावून घेतला.

2. अर्शदीप सिंह

भारतीय संघात डेथ ओव्हरला गोलंदाजी करुन सामना फिरवण्याची क्षमता म्हणुन अर्शदीपकडे पाहिले जात आहे. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंहने आपल्या किलर बॉलिंगने सर्वांची मने जिंकली. . अर्शदीप सिंह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बाहेर पडला होता, पण त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन केले आणि आपल्या स्विंगने सगळ्यांना आश्चर्य चकित केले. अर्शदीप सिंह डेथ ओव्हरला गोलंदाजी करुन सामन्याची दिशा बदलु शकतो, म्हणुन तो या विश्वचषकात म्हत्वाचा गोलंदाज ठरला जात आहे. भारतीय संघालाही त्याच्याकडून खुप अपेक्षा आहे. (हे देखील वाचा: T20 World Cup: टी-20 विश्वचषकातील IND vs PAK सामन्यावर पावसाचे सावट, चाहत्यांच्या उत्सहावर पाणी फिरण्याची शक्यता)

3. अक्षर पटेल

भारतीय संघाचा अष्ट्रपेलु खेळाडू अक्षर पटेलने काही वेळात भारतीय संघात कमाल केली आहे. रवींद्र जडेजाच्या जागी त्याची भारतीय संघात निवड झाली आणि त्या संधीचे त्याने साने केले. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने त्याने अनेक सामने जिंकुन दिले आहे. ऑस्टेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्यांची गोलंदाजी प्रभावित ठरली आणि भारतीय संघात मधल्या फळीत त्यांची फलंदाजीही महत्वाची भूमिका ठरते. त्यामुळे या विश्वचषकात तो आपली चमक नक्कीच दाखवु शकतो.