ICC World Test Championship: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 'या' भारतीय फलंदाजांनी केल्या आहे सर्वाधिक धावा, येथे पाहा संपूर्ण यादी
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

ICC World Test Championship: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम (IND vs ENG Test Series) येथील डॉ वाय एस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 चा नवीन हंगाम सुरू आहे. फलंदाजांची खेळण्याची कला कसोटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आता स्टार फलंदाज विराट कोहलीला मागे टाकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. (हे देखील वाचा: ICC U19 World Cup 2024: विराट कोहलीपासून यश धुलपर्यंत... 5 कर्णधारांनी जिंकली आहे भारतासाठी अंडर-19 विश्वचषक ट्रॉफी)

'या' भारतीय फलंदाजांनी केल्या आहे सर्वाधिक धावा

रोहित शर्मा : वर्ल्ड चॅम्पियनशिप टेस्टमध्ये टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 48.73 च्या सरासरीने 2242 धावा केल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात रोहित शर्माने सात शतके झळकावली आहेत.

विराट कोहली : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 39.21 च्या सरासरीने 2235 धावा केल्या आहेत. या कालावधीत, विराट कोहलीने डब्ल्यूटीसीमध्ये चार शतके आणि 10 अर्धशतकेही केली आहेत.

चेतेश्वर पुजारा : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजाराने WTC मध्ये 1769 धावा केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा टीम इंडियाचा भाग नाही.

अजिंक्य रहाणे : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 1589 धावा केल्या आहेत.

ऋषभ पंत : ऋषभ पंत त्याच्या भीषण अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋषभ पंतने अजूनही आपले स्थान कायम राखले आहे. ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 1575 धावा केल्या आहेत. या यादीत ऋषभ पंत पाचव्या स्थानावर आहे.