Team India (Photo Credit - Twitter)

India Tour Of Zimbabwe: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 (2024 ICC पुरुष T20 विश्वचषक) चे विजेतेपद पटकावल्यानंतर आता भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. 6 जुलैपासून दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 आंतरराष्ट्रीय (T20 International Series) सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान शुभमन गिलच्या (Shubman Gill) हातात असेल आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे नेतृत्व सिकंदर रझाकडे असेल. या मालिकेत पाच सामने खेळवले जाणार असून त्यातील पहिला सामना 6 जुलै रोजी होणार आहे. टीम इंडिया हरारे येथे पोहोचली असून लवकरच सरावला सुरूवात करणार आहे. या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या मालिकेत कोणते भारतीय फलंदाज चमत्कार करू शकतात हे जाणून घेऊया.

सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील

रियान पराग (Riyan Parag)

स्टार फलंदाज रियान पराग दीर्घ काळापासून टी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये, रियान परागने 16 सामन्यांमध्ये तीनदा नाबाद राहताना 573 धावा केल्या. या काळात रियान परागची सरासरी 52.09 आणि स्ट्राइक रेट 149.21 होता. याशिवाय रियान पराग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रियान परागने 10 सामन्यात 85 च्या सरासरीने 510 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत रियान परागची बॅट झिम्बाब्वेविरुद्ध जोरदार बोलू शकते.

शुभमन गिल (Shubman Gill)

झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर असेल. शुभमन गिलला आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये संधी मिळाली नाही, त्यामुळे शुभमन गिलला झिम्बाब्वेविरुद्ध स्वतःला सिद्ध करायला आवडेल. शुभमन गिलने आयपीएल 2024 मध्ये 12 सामने खेळले आणि 12 डावात 38.72 च्या सरासरीने आणि 147.40 च्या स्ट्राइक रेटने 426 धावा केल्या. याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलने 14 सामन्यात 147.57 च्या स्ट्राइक रेटने 335 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा: ICC T20 World Cup 2024: पूर्ण ताकद वापरूनही हे 5 फलंदाज शतक झळकवण्यात हुकले; यादीत ठरले 'अनलकी क्रिकेटर्स'

अभिषेक शर्मा (Abhisekh Sharma)

आयपीएल 2024 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकणारा अभिषेक शर्मा झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतही शानदार फलंदाजी करताना दिसणार आहे. अभिषेक शर्माने आयपीएल 2024 मध्ये 16 सामन्यांमध्ये 204.21 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 484 धावा केल्या होत्या. याशिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही अभिषेक शर्मा सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होता. अभिषेक शर्माने 10 सामन्यात 192.46 च्या स्ट्राईक रेटने आणि 48.50 च्या सरासरीने 485 धावा केल्या होत्या.

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाला सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. ऋतुराज गायकवाड गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल या दोन्हींमध्ये चांगली कामगिरी करत आहे. विराट कोहलीनंतर ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 14 सामन्यांच्या 14 डावात 53 च्या सरासरीने आणि 141.16 च्या स्ट्राईक रेटने 583 धावा केल्या होत्या. या काळात ऋतुराज गायकवाडने 1 शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली.