आगामी आशिया चषक स्पर्धेची (Asia Cup 2023) तयारी जोरात सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतान येथे होणार आहे. पाकिस्तानने आशिया चषकासाठी संघ जाहीर केला आहे. यावेळी ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. यावेळी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात होणार आहे. बीसीसीआयने 21 ऑगस्ट रोजी आशिया चषकासाठी संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाने 7 वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने शेवटच्या वेळी हे विजेतेपद 2018 मध्ये जिंकले होते आणि त्या वेळी देखील ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.
आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये या फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा
सनथ जयसूर्या: श्रीलंकेचा माजी डावखुरा सलामीवीर सनथ जयसूर्याने एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. सनथ जयसूर्याने 25 सामन्यांच्या 24 डावांमध्ये 53.04 च्या सरासरीने 1220 धावा केल्या आहेत. यादरम्यान सनथ जयसूर्याच्या बॅटमधून 6 शतके आणि 3 अर्धशतके झळकली आहेत.
कुमार संगकारा: श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज कुमार संगकारा वनडे आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. कुमार संगकाराने 24 सामन्यांच्या 23 डावात 48.86 च्या सरासरीने 1075 धावा केल्या आहेत. यावेळी कुमार संगकाराने 4 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली.
सचिन तेंडुलकर: टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत 23 एकदिवसीय आशिया कप सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 21 डावांमध्ये फलंदाजी करताना सचिन तेंडुलकरने 51.10 च्या सरासरीने 971 धावा केल्या आहेत. यादरम्यान सचिन तेंडुलकरने 2 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत.
शोएब मलिक: पाकिस्तानचा स्टार फलंदाज शोएब मलिकने आशिया कपच्या 17 सामन्यांच्या 15 डावांमध्ये आतापर्यंत 65.50 च्या सरासरीने 786 धावा केल्या आहेत. यावेळी शोएब मलिकने 3 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली.
रोहित शर्मा: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 17 सामन्यांच्या 15 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने 745 धावा केल्या आहेत. यावेळी रोहित शर्माच्या बॅटमधून 1 शतक आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत.