टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या (Indore) होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) 1 मार्चपासून खेळवला जाणार आहे. सध्याच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणारा तिसरा सामना जिंकून कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सेनेला मालिका जिंकायची आहे. जर टीम इंडियाने तिसरी कसोटीही जिंकली तर ते सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy 2023) जिंकेल. याशिवाय आणखी दोन मोठे पैलू आहेत ज्यासाठी टीम इंडियासाठी (Team India) ही कसोटी जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत 6 गडी राखून पराभूत केल्यानंतर टीम इंडिया निश्चितपणे ड्रायव्हिंग सीटवर आहे. मात्र अद्यापही काम झालेले नाही. टीम इंडियाला इंदूरमध्येही ही कामगिरी कायम ठेवावी लागणार आहे. कारण इंदूरमध्ये संघ जिंकल्यास सलग चौथी बॉर्डर गावस्कर करंडक निश्चितच जिंकेल. यासह, कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांक आणि आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी निश्चित होईल. म्हणजेच इंदूरमधील विजयाचा टीम इंडियाला फायदा होणार आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा 'हा' अनोखा विक्रम करू शकतो आपल्या नावावर, अनेक दिग्गजांना सोडणार मागे)
टीम इंडिया कसोटीत नंबर 1 कशी होईल?
सध्या एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही सामन्यांमध्ये वाटिम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. आता टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्येही नंबर 1 बनण्याची संधी आहे. सध्याच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर असून टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे 126 रेटिंग गुण आहेत आणि टीम इंडियाचे 115 गुण आहेत. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असून इंदूर कसोटी जिंकल्यास त्याला 121 रेटिंग गुण मिळतील आणि ऑस्ट्रेलियाचे रेटिंग 119 वर घसरेल. म्हणजेच अशा प्रकारे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनेल.
WTC फायनलचे तिकीट मिळेल
इंदूरच्या विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, ऑस्ट्रेलिया 66.67 च्या विजयी टक्केवारीसह WTC टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर टीम इंडिया 61.66 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंदूर कसोटीतील विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये आपले स्थान पक्के करू शकते. सध्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाशिवाय श्रीलंकाही फायनलच्या शर्यतीत आहे. जर टीम इंडियाने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि दुसरीकडे श्रीलंकेने न्यूझीलंड दौऱ्यावर दोन्ही कसोटी सामने जिंकले तर ऑस्ट्रेलियाचा संघही अंतिम शर्यतीतून बाहेर पडू शकतो. म्हणजेच इथून किमान एक सामना जिंकणे ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाचे आहे.
होळकरमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड अप्रतिम
त्याचवेळी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. होळकरमध्ये टीम इंडिया दोनदा कसोटी क्रिकेट खेळायला आली आहे. टीम इंडियाने हे दोन्ही सामने जिंकले आहेत. 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया शेवटच्या वेळी या मैदानावर उतरली होती. तिथे टीम इंडियाने एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला.