SL Team (Photo Credit - X)

Sri Lanka National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 29 जानेवारीपासून गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर श्रीलंकेच्या संघाने 42 षटकांत पाच विकेट गमावून 136 धावा केल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली, तीन फलंदाज अवघ्या 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. श्रीलंकेचा संघ अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 518 धावांनी मागे आहे. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही.

दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडिसकडून उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा

तिसऱ्या दिवशी फक्त 27 षटके खेळली गेली. श्रीलंकेकडून दिनेश चांदीमलने सर्वाधिक 63 धावा केल्या. दिनेश चांदीमल व्यतिरिक्त कर्णधार धनंजय डी सिल्वाने 22 धावा केल्या. तसेच, ओशादा फर्नांडो, दिमुथ करुणारत्ने आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी सात धावा केल्या. तर कामिंदू मेंडिस 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दिनेश चांदीमल नाबाद 63 धावांसह खेळत आहे आणि कुसल मेंडिस नाबाद 10 धावांसह खेळत आहे.

त्याच वेळी, मॅथ्यू कुहनेमनने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुह्नेमन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन व्यतिरिक्त, नॅथन लायननेही एक विकेट घेतली. आता चौथ्या दिवशी श्रीलंकेचा संघ सामन्यात पुनरागमन करेल की ऑस्ट्रेलियन गोलंदाज फॉलोऑन लावतील हे पाहणे रंजक ठरेल. (हे देखील वाचा: Usman Khawaja New Milestone: श्रीलंकेविरुद्ध कसोटीत सामन्यात उस्मान ख्वाजाने झळकावले द्विशतक, जस्टिन लँगरचा विक्रम काढला मोडीत; घेतली पहिल्या स्थानी झेप)

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने 154 षटकांत सहा गडी गमावून 654 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने 232 धावांचे सर्वोच्च शतक झळकावले. उस्मान ख्वाजा व्यतिरिक्त कर्णधार स्टीव्ह स्मिथने 141 धावा केल्या.

या दोघांशिवाय, जोश इंग्लिसने 102 धावा, ट्रॅव्हिस हेडने 57 धावा आणि मार्नस लाबुशेनने 20 धावा केल्या. त्याच वेळी, अॅलेक्स कॅरी 46 धावांवर नाबाद राहिला, ब्यू वेबस्टरने 23 धावा केल्या आणि मिचेल स्टार्क 19 धावांवर नाबाद राहिला. दुसरीकडे, प्रभात जयसूर्याने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या आणि जेफ्री वँडरसे यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.