Tata Technologies Ransomware Attack: टाटा टेक्नॉलॉजीजवर सायबर हल्ला; हॅक झाल्यानंतर काही वेळातचं पूर्ववत करण्यात आली आयटी सेवा

टाटा टेक्नॉलॉजीजने पुष्टी केली आहे की, हा रॅन्समवेअर हल्ला (Ransomware Attack) आहे, ज्यामुळे कंपनीच्या अनेक आयटी मालमत्तांवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, कंपनीने त्यांच्या सर्व आयटी सेवा तात्काळ बंद केल्या होत्या.

Tata Technologies Ransomware Attack: टाटा टेक्नॉलॉजीजवर सायबर हल्ला; हॅक झाल्यानंतर काही वेळातचं पूर्ववत करण्यात आली आयटी सेवा
Tata Technologies (फोटो सौजन्य - फेसबुक)

Tata Technologies Ransomware Attack: टाटा टेक्नॉलॉजीजवर (Tata Technologies) मोठा सायबर हल्ला (Cyber ​​Attack) झाला. कंपनीने त्यांच्या सर्व आयटी सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, आता कंपनीने सर्व सेवा (IT Services) पूर्णपणे पूर्ववत केल्या आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजने पुष्टी केली आहे की, हा रॅन्समवेअर हल्ला (Ransomware Attack) आहे, ज्यामुळे कंपनीच्या अनेक आयटी मालमत्तांवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, कंपनीने त्यांच्या सर्व आयटी सेवा तात्काळ बंद केल्या होत्या.

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या आयटी सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, आता या सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या काही आयटी सेवा काही काळासाठी निलंबित करण्यात आल्या होत्या, ज्या आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, आमची क्लायंट डिलिव्हरी सेवा पूर्णपणे कार्यरत आहे आणि या हल्ल्यामुळे तिच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. (हेही वाचा -Tech Layoffs 2024: टेक इंडस्ट्रीत नोकरकपात सुरूच; 2024 मध्ये 451 कंपन्यांनी सुमारे 1,39,206 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले- Report)

तज्ञांकडून तपास सुरू -

टाटा टेक्नॉलॉजीने सांगितले की, आम्ही सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहोत. यासाठी, तज्ञ त्याचे मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर, गरज पडल्यास उपाययोजना केल्या जातील. आम्ही सुरक्षा आणि डेटा संरक्षणाच्या सर्वोच्च मानकांसाठी वचनबद्ध आहोत आणि कोणत्याही संभाव्य धोके कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहोत. (हेही वाचा -Job Opportunities at TATA: टाटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; लवकरच कंपनी देणार 1000 लोकांना नोकऱ्या)

टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी -

टाटा टेक्नॉलॉजीज जागतिक उत्पादन ग्राहकांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा आणि अभियांत्रिकी सेवा प्रदान करते. ही कंपनी देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी संशोधन आणि विकास (ER&D) सेवा प्रदात्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

भारतात रॅन्समवेअर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ -

दरम्यान, सुरक्षा संशोधन फर्म सायबरपीसने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की भारतात रॅन्समवेअर हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये 55 % वाढ झाली आहे. विशेषतः गेल्या वर्षी अनेक कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले होते. जुलै 2024 मध्ये, सी-एज टेक कंपनीवरही रॅन्समवेअर हल्ला झाला होता.

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 11:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).