ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies) चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये किमान 1,000 अतिरिक्त लोकांना नियुक्त करेल. अशाप्रकारे टाटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. कंपनी 12 महिन्यांच्या कालावधीत 3,000 हून अधिक फ्रेशर्सना कामावर घेण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. जानेवारीमध्ये, कंपनीने त्यांच्या विस्तारित प्रतिभा भर्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून 12 महिन्यांच्या कालावधीत 3,000 हून अधिक नवोदितांची भरती करण्याची योजना जाहीर केली.
या अंतर्गत, कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या देशातील अनेक राज्यांसह जगातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आपले कर्मचारी वाढवण्याची योजना आखली आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वॉरेन हॅरिस यांनी पीटीआय-भाषेला सांगितले की, कंपनी जास्तीत जास्त लोकांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत कंपनी कितपत यशस्वी ठरली आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 1,500 जणांची भरती केली आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात 3,000 हून अधिक लोकांची नियुक्ती केली जाणार आहे. परंतु हॅरिस यांना अशा आहे की ही संख्या 3000 च्या वर 1000 ने वाढू शकेल. ऑटोनॉमस, कनेक्टेड, इलेक्ट्रिफिकेशन आणि शेअर्ड (ACES) मोबिलिटी आणि डिजिटलमधील गुंतवणुकीमुळे टाटा टेक्नॉलॉजीज वेगाने वाढत आहे. उत्पादक कंपन्या नवीन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. (हेही वाचा: फाटलेल्या आणि भिजलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात का? काय आहे RBI चे नियम? जाणून घ्या)
कंपनीने 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रु. 1,034.1 कोटी ऑपरेटिंग उत्पन्न आणि रु. 201.2 कोटी करपूर्व नफा नोंदविला आहे, ही तिची सर्वोत्तम तिमाही कामगिरी आहे. टाटा टेक्नॉलॉजीजला एअरबसनेदेखील त्यांच्या अभियांत्रिकी, उत्पादन अभियांत्रिकी आणि सेवा धोरणात्मक पुरवठादार कार्यक्रमात सूचीबद्ध केले आहे. हा एक कार्यक्रम आहे, जो जगभरातील फक्त 17 कंपन्यांपुरता मर्यादित आहे.